file photo
file photo 
मराठवाडा

या’ महापालिकेत ‘उपमहापौर’साठी ‘कॉंग्रेस-राष्ट्रवादी’त चुरस

सकाळ वृत्तसेवा

परभणी : महापौर-उपमहापौरपदासाठी निवडणूक जाहीर होताच या पदांसाठी नवनवी नावे समोर येऊ लागली आहेत. शनिवारी (ता.१६) कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या गटागटात बैठकांचा जोर सुरु होता. महापौरपदापेक्षा उपमहापौर पदासाठी मोठी लॉंबिग सुरु झाली असून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक गुलमीरखान यांनी देखील या पदासाठी दावा ठोकला आहे.

महापालिकेच्या महापौर-उपमहापौर पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रविवार (ता.१७) व सोमवार (ता.१८) असे दोनच दिवस शिल्लक आहेत. महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाले असून सत्ताधारी कॉंग्रेसपक्षाकडे अनिता रविंद्र सोनकांबळे या एकमेव उमेदवार आहेत. कॉंग्रेसपक्षाकडे ३० सदस्यांचे संख्याबळ असून ३३ चा आकडा गाठण्यासाठी त्यांना तीन सदस्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे महाशिवआघाडी तयार होते का ? हे पाहणे देखील उत्सुकतेचे आहे. तसेच कॉंग्रेसच्या सदस्यांमध्ये देखिल विधानसभा निवडणूकांपासून दोन गट तयार झाले आहेत. एका गटाला महापौरपद द्यावयाचे असेल तर दुसऱ्या गट उपमहापौरपदाची मागणी करीत असल्याचे चित्र आहे.

गुलमीरखान यांनी ठोकला दावा...
कॉंग्रेस पक्षाकडे विद्यमान उपमहापौर माजुलाला यांनी देखील आपल्या समर्थक नगरसेवकांच्या जोरावर पुन्हा एकदा उपमहापौरपदावर दावा ठोकल्याची चर्चा आहे. त्यांच्याबरोबरच सचिन अंबिलवादे यांचे नाव चर्चेत होते. परंतु, शनिवारी (ता.१६) पक्षाचे ज्येष्ठ सदस्य गुलमीरखान यांनी या पदावर दावा ठोकला आहे. त्यासाठी त्यांना पक्षाने आश्वासन देखील माहिती मिळत आहे. तसेच त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा आमदार सुरेश वरपुडकर यांच्याकडे देखील या पदासाठी उच्छुक असल्याची मागणी केल्याचे समजते. त्यामुळे ते देखील प्रबळ दावेदार आहेत. सर्वसंम्मतीचे उमेदवार म्हणून विद्यमान सभागृह नेते भगवान वाघमारे यांच्याकडे पाहिले जात आहे.

कॉंग्रेसच्या बैठकांचा सिलसिला
शनिवारी सकाळपासूनच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये धावपळ सुरु झाली होती. सभागृह नेते भगवान वाघमारे, उपमहापौर माजुलाला यांच्या निवासस्थानी दिवसभर बैठकांचा सिलसिला सुरु असल्याची माहिती आहे. श्री. वाघमारे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील भेट दिली व आघाडीबाबत सकारात्मकता दर्शवली. तर विरोधीपक्ष नेते विजय जामकर यांनी देखील श्री. वाघमारे यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. आमदार सुरेश वरपुडकर शहरात नसल्यामुळे पक्षातीलच गट-तट स्वतंत्र पातळीवर चर्चा करीत असून त्यांची सांगड घालून सर्वसंमतीचे उमेदवार निश्चित करणे, राष्ट्रवादीशी आघाडी करणे किंवा महाशिवआघाडी तयार करण्याची कामे ते आल्यानंतरच मार्गी लागणार आहे. रविवारी (ता.१७) श्री. वरपुडकर येणार असल्याची माहिती असून त्यानंतर चक्रे जोरदार फिरण्याची शक्यता आहे.

‘राष्ट्रवादीत’ही इच्छुकांची लॉबिंग सुरु..
महापालिकेत विरोधी पक्षासह सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देखील महापौरपद-उपमहापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. डॉ. वर्षा संजय खिल्लारे यांच्या पाठोपाठ श्रीमती गवळण रामचंद्र रोडे या देखील महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीतही दोन गट झालेले असून दोनही गट वेगवेगळ्या पातळ्यांवर संख्याबळ जुळविण्यासाठी, आघाडी करण्यासाठी बैठका सुरु असल्याची माहिती आहे. तसेच अन्य पक्षांच्या नगरसेवकांकडे देखील चाचपणी केल्या जात असल्याची माहिती आहे. शिवसेना, भाजपसह कॉंग्रेसमधील काही सदस्यांचे पाठबळ मिळू शकते का? किंवा कॉंग्रेसबरोबर आघाडी करून मुख्य पद मिळवता येते का ? याची देखील चाचपणी होत आहे. उपमहापौर पदासाठी देखील अनेकांची नावे समोर येत आहेत.

निष्ठावंतांचा वेट अॅन्ड वॉच...
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात अनेक निष्ठावंत सदस्य देखील आहेत. परंतु, न त्यांच्याकडे उपद्रवमुल्य आहे, न पाठबळ मिळवण्याची क्षमता. महापालिका पदाधिकारी निवडणूकीत अपवाद वगळता कार्यक्षमता, एकनिष्ठता, निर्णय क्षमता हे निकष लावून होणारी निवड कालबाह्य झाली आहे. त्यामुळे अशा निष्ठावंतांचा वापर केवळ मतदानासाठी होत असल्याचे चित्र आहे. पदांच्या या साठमारीत आपला विचार केला जाणार का ? या विवंचनेत अनेक निष्ठावंत वेट अॅन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.
 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT