crime news crime news
मराठवाडा

अंबाजोगाईतील ‘त्या’ वीटभट्टी चालकाचा खून झाल्याचे निष्पन्न; दोघांवर गुन्हा

मंगळवारी (दि.२४) दुपारी ४ वाजताच्या सुमारास मृतदेह अंबाजोगाई परळी रोडवर वरवटी-पिंपळा शिवारात पुलाजवळील लहूदास मुंडे यांच्या शेतात सापडला

सकाळ वृत्तसेवा

मंगळवारी (दि.२४) दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह अंबाजोगाई परळी रोडवर वरवटी-पिंपळा शिवारात पुलाजवळील लहूदास मुंडे यांच्या शेतात सापडला होता

घाटनांदूर (बीड): अंबाजोगाई येथील खोलेश्वर प्राथमिक शाळेजवळील कोठाड गल्लीत राहणारे फारुख लतीफ मोमीन (वय ४२) मागील दोन दिवसापासून बेपत्ता झाले होते. फारुख अब्दुल लतीफ मोमीन यांची धायगुडा पिंपळा दूरदर्शन केंद्राजवळ वीटभट्टी आहे. रविवारी (ता.२२) सायंकाळी ते मित्रासोबत जेवायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांचा संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेऊनही ते सापडले नव्हते. (ता.२३) मंगळवारी त्यांच्या मुलाने अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी (दि.२४) दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांचा मृतदेह अंबाजोगाई परळी रोडवर वरवटी-पिंपळा शिवारात पुलाजवळील लहूदास मुंडे यांच्या शेतात सापडला.

त्यानंतर बर्दापूर पोलिसांनी अतिशय वेगवान तपास करत अवघ्या २४ तासात या खुनाचा उलगडा केला. मयताच्या मुलगा नाजेश फारोक मोमीन याच्या फिर्यादीवरून (ता.२५) बुधवारी रात्री उशिरा मारुती उर्फ वाघ्या हनुमंत चाटे (रा. वरवटी, ता. अंबाजोगाई) व अज्ञात एका व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मारुती चाटे यास ताब्यात घेतले असून अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

Andaman Sea tragedy : अंदमान समुद्रात भीषण दुर्घटना; २५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती, मानव तस्करीचा उलगडा

Abhishek Sharma Axar Patel Dope Test : अभिषेक शर्मा, अक्षर पटेल 'नाडा' च्या रडारवर; आता कुठे जाता हे सांगावं लागेल... नाहीतर...

Gen Z Fashion Trends 2026: आउटडेटेड झालेल्या वायर इअरफोनच्या प्रेमात Gen Z, फॅशनमध्ये का परतला रेट्रो टच?

SCROLL FOR NEXT