मराठवाडा

तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणीची हत्या

हरी तुगावकर

लातूर : येथील विशालनगर भागात घरात घुसून एका मुलीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करण्यात आला. गजबजलेल्या भागात भरदुपारी खून करून मारेकरी फरार झाला. ही घटना मंगळवारी (ता.१६) येथे घडली. मारेकऱयांचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली आहे. खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.

येथील विशालनगर भागात आनंद यादव यांचा बंगला आहे. त्यांचा मेडिकलचा व्यवसाय आहे. त्यांची मुलगी अपूर्वा आनंद यादव (वय २०) ही कर्नाटकात एका महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. मंगळवारी (ता. १६) या मुलीचे आई व वडील हे दोघेही बाहेर गेले होते. दुपारी ती घरात एकटीच होती. हे पाहून
मारेकरी घरात घुसला. त्याने या तरुणीवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यात गळ्यावर व पोटावर त्याने वार केले. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला.

काही वेळानंतर आई घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर या तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आला. त्यानंतर ठसेतज्ज्ञाच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी टी-पॉयवर असलेल्या चहाचा कप, पाण्याचा ग्लास तसेच इतर ठिकाणचे ठसेही या पथकाने घेतले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तपासाच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना केल्या. या तपासासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात
आली. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : हैदराबादची तगडी फलंदाजी 113 धावात ढेपाळली; फायनलवर केकेआरची पकड

Income Tax Raid: ‘रेड’ची पुनरावृत्ती! २६ कोटींची रोकड जप्त; ९० कोटींची बेहिशोबी मालमत्ता आयकरच्या हाती

Israel–Hamas War : हमासने इस्राइलवर डागली क्षेपणास्त्र, तेल अवीवमध्ये हाहाकार, 5 महिन्यांनंतर केला मोठा हल्ला

T20 World Cup सुरू होण्यापूर्वीच यजमानांना करावा लागला संघात मोठा बदल! 'या' वेगवान गोलंदाजाची केली निवड

Delhi Hospital Fire: दिल्लीतील बेबी केअर सेंटरचा मालकाला अटक; आगीत ७ बालकांनी गमावला जीव, घटनेनंतर झाला होता फरार

SCROLL FOR NEXT