Murder crime sakal media
मराठवाडा

अनैतिक संबंधातून गेवराईत पत्नीच्या प्रियकराचा खुन

पत्नीही गंभीर; आरोपी स्वत: ठाण्यात हजर

वैजीनाथ जाधव

गेवराई (जि. बीड) - पत्नीसोबत एकाचे अनैतिक संबंध असल्याने संतापलेल्या पतीने पत्नी व तिच्या प्रियकरावर धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. ही घटना तालुक्यातील तळणेवाडी येथे गुरुवारी (ता. १४) रात्री उशिरा घडली. बबन ज्ञानोबा खरखाडे (वय ४५) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी रामेश्वर गिते हा घटनेनंतर फरार झाला होता. दरम्यान तो स्वतःहून रात्री उशिरा शेवगाव (जि. नगर) पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तालुक्यातील तळणेवाडी येथे आरोपी रामेश्वर गिते हा कुटुंबासह वास्तव्यास आहे. दरम्यान त्याची पत्नी व बबन खरखाडे यांचे अनैतिक संबंध असल्याचा त्याचा संशय होता. त्याने या दोघांवर गुरुवारी रात्री प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्याने या हल्ल्यात बबन खरखाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली असून तिला गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी रामेश्वर गिते हा फरार झाला होता. रात्री स्वतःहून तो शेवगाव पोलिस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT