murder esakal
मराठवाडा

Badnapur Crime : जवसगाव शिवारात युवकाचा खून; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

‘तू आमची दुचाकी का चोरलीस’ असे म्हणत चौघांनी एकास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

बदनापूर - ‘तू आमची दुचाकी का चोरलीस’ असे म्हणत चौघांनी एकास लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याचा मृतदेह खदानीत फेकून दिला. ही घटना शनिवारी (ता. २६) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जवसगाव शिवारात घडली. या प्रकरणी चौघा जणांविरुद्ध रविवारी (ता. २७) सायंकाळी बदनापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिलपुरी येथील सिद्धार्थ रामदास मांदळे (वय ३०) याला शनिवारी सायंकाळी जवसगाव शिवारात संशयित गणेश कैलास जाधव, आकाश अशोक जाधव, तुळशीराम गायकवाड, कुंडलिक भगवान तिरुखे (सर्व रा. दरेगाव ता. जालना) यांनी संगनमत करून ‘तू आमची दुचाकी का चोरली’, असे म्हणत लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. या घटनेत सिद्धार्थ मांदळे यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहास संशयितांनी खदानीत फेकून दिले.

या प्रकरणी किरणबाई सिद्धार्थ मांदळे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यात संशयितांनी जातीय द्वेषातून हे कृत्य केल्याचे नमूद केले. याप्रकरणी चौघा संशयितांविरुद्ध बदनापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT