file photo 
मराठवाडा

वसमत येथे धारदार शस्त्राने युवकाचा खून; आरोपी दुचाकीवरुन पसार

संजय बर्दापुरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत येथील कारखाना रोडवरील छत्रपती शिवाजी गृहनिर्माण संस्था जवळील रस्त्यावर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी धारदार शस्त्राने एका २६ वर्षीय युवकावर हल्ला करुन त्याचा खून करुन पसार झाल्याची घटना गुरुवारी ( ता. ११ ) रोजी रात्री अंदाजे दहाच्या सुमारास घडली आहे.

काशिनाथ लिंगाप्पा बावगे वय अंदाजे २६ वर्ष असे मृतकाचे नाव असून लेबर कॉलनी कारखाना रोड वसमत येथील रहिवासी आहे. माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय वसमत येथे हलवले आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी वसीम हाशमी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी तपास चक्रे फिरवली असून लवकरच आरोपीताना गजाआड करण्याचा विश्वास त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे.

विना नंबरची दुचाकी व तोंडाला बांधून आरोपीतानी खून करुन दुचाकीवरुन पसार झाले. काही मिनिटातच ही घटना घडली असून पोलिसांकडून आरोपीतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. घटना प्रसंगी उपस्थित प्रत्यक्षदर्शी किंवा प्रवाशी आरोपीस ओळखत असल्यास किंवा घटना पाहिले असल्यास त्याची माहिती शहर पोलिस ठाण्यात द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI : आज मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडणार

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

SCROLL FOR NEXT