Amarbapu Pundalikrao Nade sakal
मराठवाडा

Latur News : भाषणानंतर पॅनेलप्रमुखाचा व्यासपीठावरच मृत्यू

मुरूड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचार थांबवला; सर्वच पॅनेलनी बॅनर, पोस्टर काढले

विकास गाढवे

लातूर : राज्यातील सर्वात मोठ्या मुरूड (ता. लातूर) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचाराला वेग आला असतानाच बुधवारी (ता. १४) रात्री धक्कादायक घटना घडली. विरोधी पॅनेलचे प्रमुख विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमरबापू पुंडलिकराव नाडे (वय ४३) यांचा भाषणानंतर काही वेळात व्यासपीठावरच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी अमृता या निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार असून त्यांच्या व पॅनेलमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री सार्वजनिक स्टेजवर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.पॅनेलप्रमुख म्हणून नाडे यांनी भाषण केले व ते व्यासपीठावरील पत्नी अमृता यांच्या शेजारील खुर्चीत विराजमान झाले. त्यानंतर सदस्यपदाचे उमेदवार हणमंतबापू नागटिळक यांचे शेवटचे भाषण सुरू असतानाच काही वेळातच नाडे यांना घाम आला. ते दोनवेळा पाणी पिले व काही क्षणातच त्यांनी मान टाकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेत धावपळ सुरू झाली.

सभा स्थगित करून नाडे यांना तातडीने येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथून लातूरला सर्वोपचार केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच नाडे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली. निवडणुकीत रविवारी (ता. १८) मतदान असताना या घटनेमुळे सर्वांनाच दुःख अनावर झाले. यामुळे सर्व तीनही पॅनेलने प्रचार थांबवत गावात ठिकठिकाणी लावलेले प्रचाराचे बॅनर व पोस्टर रातोरात काढून घेतले.

गुरूवारी (ता. १५) बाजारपेठ बंद ठेवण्यात आली असून शाळा व महाविदयालयही बंद ठेवण्यात आले आहे. (के.) नाडे यांनी गावात अष्टविनायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य केले आहे. प्रतिष्ठानचे अष्टविनायक कनिष्ठ महाविद्यालय आहे. नाडे यांच्यावर गुरूवारी सकाळी त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी अमृता, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT