नांदेड : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (नाबार्ड) मार्फत जिल्ह्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठी चार हजार ८४३ कोटी रुपयांचा संभाव्य ऋण आराखडा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. नऊ) प्रकाशीत करण्यात आला. यात पीककर्ज वाटपासाठी दोन हजार ५३९ कोटींचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
या वेळी ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक राजेश धुर्वे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे, कंधारचे उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक गणेश पाठारे तसेच विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) दरवर्षी संभाव्य ऋण आराखडा तयार करते. या आराखड्यावर आधारित जिल्ह्यातील सर्व बँकांचे वार्षिक लक्षांश निश्चित होत असतात.
दोन हजार ५३९ कोटींचे पीककर्ज
‘नाबार्ड’च्या आराखड्यानुसार २०२०-२१ मध्ये नांदेड जिल्ह्यासाठी दोन हजार ५३९ कोटी ६९ लाखांचे पीककर्ज निश्चित करण्यात आले आहे. तसेच शेतीमधील मुदत कर्जासाठी ३४७ कोटी ४२ लाख रुपये अंदाजित केले आहेत. कृषी आधारभूत कर्जासाठी ७७ कोटी ३० लाख, कृषी प्रक्रिया उद्योगासाठी १३६ कोटी ३१ लाख, एमएसएमईसाठी ९६२ कोटी ७६ लाख तसेच स्वयंसहायता बचत गटांसाठी १२९ कोटी ८१ लाख, असे एकूण चार हजार ८४३ कोटी ४२ लाखांचा संभाव्य कर्ज आराखडा निश्चित करण्यात आला आहे.
हेही वाचा....खेळणीतील नोटा देणारे भामटे कोठडीत
कृषी, कृषी आधारित क्षेत्रासाठी कर्जपुरवठा
नाबार्डने कृषी आणि कृषी आधारित क्षेत्रासाठी असलेल्या संभावना, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि अपेक्षित कर्जपुरवठा यांची सांगड घालून २०२० - २१ वर्षासाठी आराखडा सादर केला. या वेळी राजेश धुर्वे यांनी कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रासाठी, ग्रामीण व्यवसायासाठी आणि इतर क्षेत्रासाठी आखलेल्या पत धोरणाची माहिती दिली.
हेही वाचलच पाहिजे....कर्जमाफीमुळे शेतकरी संतप्त : कसे ते वाचलेच पाहिजे
पीककर्जासाठी अडीच हजार कोटी
‘नाबार्ड’च्या संभाव्य ऋण आराखड्यात पीककर्ज वाटपासाठी दोन हजार ५३९ कोटींचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यंदा यात ८० कोटींची वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी खरिपासाठी एक हजार ९६७ कोटी, तर रब्बीसाठी ४९१ कोटी, असे एकूण दोन हजार ४५९ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट होते. परंतु, आजपर्यंत एक लाख २१ हजार ९७४ खातेदारांना ५५४ कोटी २४ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. खरीप व रब्बीत पीककर्ज वाटपाचे प्रमाण केवळ २२ टक्के आहे.
जिल्ह्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास (नाबार्ड) कडून चार हजार ८४३ कोटी रुपयांचा संभाव्य ऋण आराखडा जाहीर केला आहे.
- राजेश धुर्वे, जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.