file photo 
मराठवाडा

परभणी शहरात संचारबंदी नावालाच ; रस्त्यावर नागरीकांचा सर्रास वावर, पोलिसांकडून पत्रकारांना मारहाण

गणेश पांडे

परभणी ः कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेली संचारबंदी शहरात केवळ नावालाच दिसून आली. रस्त्यावर सर्रास लोक वावरतांना दिसत होते. कुणी गाड्या घेवून तर कुणी पायी जातांनाचे चित्र पहावयास मिळाले. व्यापाऱ्यांनी मात्र प्रशासनाच्या आदेशाचे पालन करुन त्यांची प्रतिष्ठाणे पूर्णत: बंद ठेवली होती.

परभणी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी व त्यास प्रतिबंध घालण्यायाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शनिवार व रविवार या दोन दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीचा मुळ उद्देश हा लोकांनी घराबाहेर पडू नये व एकत्र जमू नये हा होता. परंतू परभणी शहरात संचारबंदी केवळ नावालाच दिसत होती. मुख्य शहरासह बाह्य वस्त्यामध्ये लोकांचा मुक्त वावर दिसत होता. वसमत रस्ता, जिंतूर रस्ता, गंगाखेड रस्तयावरील कॉलन्यामध्येही लोक रस्त्यावर आलेले दिसत होते. मुख्य बाजारपेठेतही तुरळक गर्दी दिसत होती. सरकारी दवाखाना परिसरातही चांगलीच गर्दी दिसून येत होती. बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरातही लोकांचा वावर दिवसभर दिसून आला. संचारबंदीतून सुट असणाऱ्या अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर उर्वरित दुकाने पूर्णपणे कडकडीत बंद होती. व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

वसमत रस्त्यावर शनिवारी (ता.13) सकाळी वर्तमान पत्राच्या पार्सलासाठी गेलेल्या पत्रकारांना नवामोंढा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून मारहाण झाली. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले होते. काळी कमान परिसरात सकाळी लोकांची गर्दी जमली होती. त्यामुळे त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागली. परंतू पत्रकार असल्याचे सांगूनही नवामोंढा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.

आरटीपीसीआर केंद्र बंद
महापालिकेच्यावतीने शहरात चार ठिकाणी आरटीपीसीआर तपासणी केंद्र उभारण्यात आली होती. परंतू अचानक संचारबंदी लागू झाल्याने हे केंद्र बंद करण्यात आली. या केंद्रावर ना आरोग्य कर्मचारी होते ना महापालिकेचे कर्मचारी होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात लसीकरण व आरटीपीसीआर चाचणी सेवा सुरु ठेवण्याचे नमुद होते. परंतू हे चार ही केंद्र शनिवारी बंद होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT