Nanded Lok Sabha Election Latest News  
मराठवाडा

Nanded Lok Sabha Election : भूमिपुत्र की जावई? रंगली चर्चा, लागल्या पैजा! कोणाला मिळणार मतदारांची पसंती?

Nanded Lok Sabha Election Latest News : नांदेड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता जोरात सुरू झाली असून आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडू लागल्या आहेत. भाजपने मोदी गॅरंटीचा गजर सुरू केला आहे तर कॉँग्रेसने फसवणुकीचा आरोप करत सर्वसामान्यांच्या पदरात काय पडले? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

वंचितने तर महायुती आणि महाआघाडी एकच असल्याचे सांगून बहुजनांना कुणीच वाली नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीने कार्यक्षेत्रात नसलेला उमेदवार भाजपने दिला असल्याचा आरोप करताना कंधारचे पार्सल कंधारला पाठवा, असा नारा दिला आहे. याच मुद्यावर त्यांनी प्रचाराचे रान उठवले असून मतदार कार्यक्षेत्राबाहेरील उमेदवाराला पसंती देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी येत्या ता. २६ एप्रिलला मतदान होत आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करत प्रचारात बाजी मारली आहे. महायुतीतर्फे भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण हे कॉँग्रेसला रामराम करत भाजपात आल्याने महायुती सध्या हवेत आहे. महायुतीचे नेते विजय निश्चित असल्याची वल्गना करताना गत वेळीपेक्षा रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येण्याचा दावा करत आहेत. परंतु दुसरीकडे परिस्थिती मात्र वेगळी दिसून येत असल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी कॉँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. सर्वसामान्य मतदार, सगे सोयरे यांच्या भेटीवर त्याचा जोर दिसून येत आहे. तर बाहेरील क्षेत्राचा लादलेला भाजपचा उमेदवार स्वीकारणार का? असा प्रश्न या निमित्ताने ते उपस्थित करत आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर आणि मुखेड या तालुक्याने मताधिक्य दिले होते.

महाविकास आघाडीचा उमेदवार स्थानिक नायगाव मतदारसंघातील असल्यामुळे त्यांचा या विभागात प्रभाव अजूनही आहे. यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीला मताधिक्‍य मिळणार का? असा प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केला जात असून गेल्या निवडणुकीत प्रतापरावांच्या विरोधात असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना विरोध म्हणून मतदारांनी चिखलीकरांना निवडून दिले होते. आता प्रतापराव आणि अशोकराव एकत्र आल्यामुळे मतदार संतापले असल्याची चर्चा आहे. येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचे मताधिक्य वाढणार का कमी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने ओबीसी मतदारांची लक्षणीय संख्या विचारात घेत ओबीसी लिंगायत उमेदवार दिला आहे. हा उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील आणि चळवळीतील एक धडाडीचा कार्यकर्ता आहे. सामाजिक, शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडणे तसेच शहरात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा व्हावा, यासाठी मोठे आंदोलन करण्यामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी समाज दुखावला गेल्याने तो एकवटला असून वंचितने हेच हेरून भोसीकर यांना उमेदवारी दिली आहे. मागील काळात ओबीसी समाज कॉँग्रेसच्या बाजूने होता. आता तो दोन मुख्य पक्षांपेक्षाही वंचितच्या मागे राहणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT