file photo 
मराठवाडा

नांदेडला अधिकाऱ्यांने घेतली दहा लाखाची लाच !

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : व्हॅट टॅक्स व्याजासह रिफंड मिळविण्याचा प्रस्ताव ‘जीएसटी’ कार्यालय परभणी येथून मागून घेऊन सदर फाईल पुढे सह आयुक्तांमार्फत अतिरिक्त आयुक्त वस्तू व सेवा कार्यालय नागपूर यांच्या अंतिम मंजुरीला पाठविण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नांदेड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील उपायुक्त बाळासाहेब तुकाराम देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. सहा) रात्री आठ वाजता पकडले.
 
    नांदेड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयात कार्यरत असलेले उपायुक्त बाळासाहेब देशमुख यांच्याकडे तक्रारदाराने साखर कारखाना उभारणीवेळी खरेदी करण्यात आलेल्या मशिनरी व इतर साहित्यासाठी भरण्यात आलेला व्हॅट व्याजासह परत मिळावा म्हणून प्रस्ताव दाखल केला होता. परंतु, हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यासाठी येथील उपायुक्त बाळासाहेब तुकाराम देशमुख (वय ५३, मुळ रा. साहेब सदन, वाशी, ता.वाशी, जि.उस्मानाबाद) यांनी तक्रारदारास दहा लाख रुपयांची लाच मागितली. ही लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागात रविवारी (ता. पाच) या प्रकरणाची तक्रार दिली. 

पथकाने लावला सापळा
या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी सापळा लावला. यात दहा लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सोमवारी (ता. सहा) पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांनी आपल्या पथकासह रेल्वेस्थानक, गोकुळनगर परिसरात असलेल्या हॉटेल मिडलॅंड परिसरात सापळा लावला. रात्री आठच्या सुमारास कारखानदार तक्रारदाराकडून दहा लाख रुपये घेताना बाळासाहेब देशमुख यांना पकडण्यात आले. सदरील कार्यवाही पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे, पोलिस नायक गणेश केजकर, गणेश तालकोकुलवार, अंकुश गाडेकर, निळकंठ यमुनवाड यांनी पार पाडली. श्री. डोंगरे यांच्या फिर्यादीवरून देशमुख याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 


‘टोल फ्री हेल्पलाईन’वर संपर्क करा
शासकीय अधिकारी, कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईलवर लोकसेवकांचे ‘एसएमएस’, ‘व्हीडीओ’, ‘ क्लीप’ असल्यास, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असल्यास ‘टोल फ्री हेल्पलाईन’ क्रमांक १०६४ किंवा कार्यालयाचा फोन क्रमांक ०२४६२ -२५३५१२ किंवा पोलिस उपाधीक्षक श्री. विजय डोंगरे यांच्या मोबाईवर (८९७५७६९९१८) संपर्क करावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं; 10 विद्यार्थी जखमी, एकाचा मृत्यू

Hardik Pandya News : हार्दिकने 'Mumbai' सोडली! क्रिकेट करियर वाचवण्यासाठी उचलले मोठे पाऊल; नेमकं काय घडलं?

Eknath Shinde: ''सागर बंगल्यावर पोलिस पाठवले तेव्हा...'', ठाकरेंच्या फडणवीसांवरील भूमिकेवरुन एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI: प्लेइंग XI मध्ये वैभव सूर्यवंशी दिसणार? कोणाचा पत्ता कट होणार आकाश चोप्रांनी घेतलं थेट नाव! म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावर नवीन बांधलेल्या पुलाचा माती भराव खचला

SCROLL FOR NEXT