nanded  sakal
मराठवाडा

Nanded : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प; पुण्याहून मायेची शिदोरी घेऊन दीपावलीच्या सुट्टीत विद्यार्थी घरी परतले.

पुण्यातील शंकरराव भोई फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड जिल्हात गेल्या आठ वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरू आहे.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर - दरवाजावर मांगल्याचे तोरण, अंधारात चमकणारे आकाशदिवे, घरापुढे रांगोळी, दीपावलीची घाई, फराळाची रेलचेल असे चित्र पाहायला मिळाले‌. तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबात.. तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहत असुन हे विद्यार्थी दीवाळीच्या सुट्टीत गुरुवारी (ता नऊ) सकाळी नांदेडला परतले आहेत.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी फुलांची तोरण, आकाशदिवे,दीवाळीसाठी नवीन कपडे आशी मायेची शिदोरी घेऊन हे विद्यार्थी घरी परतले असून त्यांचे उत्सवात स्वागत करण्यात आले आहे.

पुण्यातील शंकरराव भोई फाउंडेशनच्या माध्यमातून नांदेड जिल्हात गेल्या आठ वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी पुण्यजागर प्रकल्प सुरू आहे.गेल्या शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील धामदरी, मालेगाव, अर्धापूर,येळेगाव,नांदला येथील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात राहत आहेत

हे विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीत घरी परत आले आहे आहेत.गावी परतण्यापुर्वी शंकरराव भोई फाउंडेशनच्या वतीने वाॅटरपार्क, खरेदी, स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन हे विद्यार्थी घरी परतले आहे.पुण्यजागर परिवारातील सदस्यांनी या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.

हे विद्यार्थी घरी परत आल्यावर घराला तोरण बांधण्यात आले, तसेच आकाशदिवे लावण्यात आले व घरासमोर रांगोळी काढून दीपावलीच्या सनाला उत्साहात सुरुवात केली आहे.त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता.

या मुलांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी भोई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई, हेमंत गोसावी, शमिका होजगे, सुभाष सरपाले, स्मिता भोसले,सागर पवार, शिरीष मोहिते, अशोक दोरगडे , पल्लवी वाघ,गितांजली देगावकर, गुंजाळ,आर्चिता मडके, पुण्यजागर परिवाराचे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत मुळे, नागोराव भांगे, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर, डॉ वैभव पुरंदरे, सुधाकर टाक, दत्ता टोकलवाड यांनी पुढाकार घेतला आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Solapur News: 'शेतकऱ्यांचा माजी गृहराज्यमंत्र्यांच्या दारात टाहो'; दोन वर्षांपासून पाच कोटींची रक्कम थकवली, साेलापुरात बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT