मराठवाडा

नांदेडमध्ये दुचाकीचोरीच्या घटनेत वाढ

सकाळवृत्तसेवा

नांदेड : नांदेड शहरात चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. एकीकडे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत तर दुसरीकडे दुचाकीचोरी वाढल्या आहेत. इतवारा ठाण्याच्या हद्दीतून  दोन दुचाकी पळविल्या.

दुचाकीवरून येऊन वाटमारी करणे, मोबाईल हिसकावून पोबारा करणे, चेन तोडणे, बॅग लिफ्टिंग आदी घटनांत वाढ होत असताना त्यामध्ये आता दुचाकीचोरांची भर पडली आहे. बाजारपेठेत,  बँक परिसर, शाळा, महाविद्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी पाळत ठेवून हे दुचाकी चोरटे दुचाकीचालक काही अंतरावर जाताच त्याची दुचाकी पळवित आहे.

शहर व जिल्ह्यात या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. स्थानिक पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा या चोरट्यांना पकडण्यासाठी अपयशी ठरल्या आहेत. पोलिसांचा वचक संपल्याने चोरटे व अवैध धंदे चालकांची हिंमत वाढली आहे. पोलिस अधीक्षक संजय जाधव आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी विशेष लक्ष घालून शहरात वाढणाऱ्या या घटना थांबवाव्यात अशी मागणी होत आहे. 

शहरातील इतवारा भागातील बरकतपुरा परिसरात महमद जियोद्दीन महमद फईमोद्दीन यांनी त्यांच्या मावस भाऊ शेख अब्दुल वहाब यांना वापरण्यासाठी दिली होती. त्याने आपल्या घरासमोर लावलेली दुचाकी ( एमएच२६एए-७४१६) ही अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. 9 ते 11 नोव्हेंबरदरम्यान ही दुचाकी पळविली. तर दुसऱ्या घटनेत मंडई इतवारा भागातून अब्दुल रशीद अजीमोद्दीन सहाब यांची दुचाकी ( एमएच२६-एएन-२६५५) ही चोरट्यांनी आठ ते नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान चोरून नेली.

दुचाकीचालकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर अखेर इतवारा ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास हवालदार शेख रसूल आणि एपीआय एस. जी. रोयलावार हे करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Satara Lok Sabha : उदयनराजेंनी आधी घड्याळाकडं पाहिलं अन् बरोबर 7 वाजून 7 मिनिटांनी केलं मतदान

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT