nanded  sakal
मराठवाडा

Nanded : जिल्हाधिकारी कार्यालयात तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

आमदार राजेश पवार यांच्याविरूद्ध केली तक्रार

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - भारतीय जनता पक्षाचे नायगावचे आमदार राजेश पवार हे मशिदीच्या इनामी जमिनीवर अतिक्रमण करत असल्याचा आरोप करत सय्यद जियाओद्दिन इनामदार या युवकाने सोमवारी (ता. २५) जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतःवर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित पोलीस कर्मचारी आणि काही नागरिकांनी वेळीच त्या युवकाला पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

वसरणी येथे सर्व्हे क्रमांक ५५ मध्ये नावघाट मशिदीची इनामी जमीन आहे. या जमिनीला लागून आमदार राजेश पवार यांची जमीन आहे. पण राजेश पवार इनामी जमिनीत नऊ गुंठे जागेवर जबरदस्तीने कब्जा करत असल्याची तक्रार इनामी जमीन कसणाऱ्या इनामदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या जमिनीवर कुठलेही काम करू नये, असा आदेश वक्फ बोर्ड प्राधिकरणाने ता. २१ सप्टेंबर रोजी दिला. असे असताना आमदार पवार हे जमिनीवर जेसीबी लावून भिंत बांधण्याचे काम करत असल्याची तक्रार आहे.

याबाबत तक्रार देऊनही कुठलीही दखल घेतली जात नसल्याने या युवकाने थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्याच्या वतीने कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT