नांदेडला भाजीपाला बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.  
मराठवाडा

नांदेडकरांनो....उघडा डोळे, व्हा गंभीर!

अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी घरी राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासह पोलिस विभागाने केले असले तरी अनेकजण सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर येऊन विनाकारण गर्दी करत असल्याचे काही भागात चित्र आहे. जगभरात पसरत चाललेल्या कोरोनाने आता नांदेड जिल्ह्यालगत असलेल्या हिंगोलीपर्यंत प्रवास केला आहे. त्यामुळे आता सावध आणि दक्ष राहण्याची वेळ आली आहे. 

जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणचे प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. संचारबंदी लॉकडाऊन असल्यामुळे घराबाहेर पडू नका, असे सांगितले आहे. तरी देखील काहीजण अजूनही घराबाहेर विनाकारण आल्याचे दिसून येत आहे. घरपोच किराणा आणि भाजीपाला देण्याचे जाहीर करण्यात आले असून तसे महापालिकेने नियोजनही केले आहे. तरी देखील नागरिक किराणा दुकानावर तसेच भाजीपाला बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत.

सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा
पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्याही काही ठिकाणी दिसून येत आहे. पूर्णा रस्त्यावर सकाळच्या वेळी भरणारा भाजीपाला बाजारात नागरिकांची गर्दी होत आहे. पूर्णा रोडवरील भाजीपाला बाजारात तर सोशल डिस्टन्सिंगचे सर्रास उल्लंघन करताना दिसून येत आहे. त्या ठिकाणी कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाताना दिसून येत नाहीत. नागरिकांसह विक्रेते देखील जवळजवळ भाजीपाला घेऊन विक्रीला बसले आहेत. याबाबत पोलिसांनी देखील सांगितले तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. भाजीपाला विक्रेत्यासोबतच नागरिकांनी देखील शिस्त लावण्याची गरज आहे.

हे ही वाचलेच पाहिजे - ‘ते’ चौदाजन विशेष निगरानीखाली

सूचनांचे पालन करा
शासनाने जमावबंदी आणि संचारबंदी लागू केली असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत. तरी देखील नांदेड शहरातील काही भागात त्यांचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. अनेकजण ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. सकाळपासूनच लोक रस्त्यावर बिनधास्त फिरताना दिसत आहेत. विशेष करुन शहरातील अंतर्गत रस्त्यावर अजूनही गर्दी दिसून येत आहे. पोलिसांनी कारवाई करुन सुद्धा काही महाभागांचा रस्त्यावरचा वावर कमी झालेला नाही. त्यामुळे आता याबाबत जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI युगात मोठी संधी, पण राष्ट्रीय सुरक्षेची आव्हानेही गंभीर... भारताचे माजी Deputy NSA पंकज सरन यांची AP Globale Digital ला खास मुलाखत

Business Idea: पावसाळ्यात कमाईची मोठी संधी! फक्त 5,000 रुपयांपासून सुरू करा हे 10 फायदेशीर व्यवसाय; कमी गुंतवणुकीत मोठी कमाई

Mumbai News: राज्यात पावसाचा हाहाकार! ६३ जणांचा मृत्यू, प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत; गिरीश महाजन यांची घोषणा

Palghar 10 Foot Python Rescue : रात्री 10 वाजता घरात शिरला 15 किलो वजनाचा तब्बल 10 फुटांचा अजगर! गावकऱ्यांची उडाली झोप, पुढं काय घडलं?

पाकिस्तानी गँगस्टरकडून नागपूरच्या युवकांना फुस; १० जणांना एटीएसने घेतलं ताब्यात, कसा केला जात होता संपर्क?

SCROLL FOR NEXT