भाजप भाजप
मराठवाडा

'उस्मानाबादमधील शिवसेनेचे खासदार आणि आमदार म्हणजे रंगा-बिल्लाची जोडी'

पोलिसांनी बळाचा वापर करीत केंद्रीय मंत्री राणे यांना अटक केल्याचा आरोपही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला

सयाजी शेळके

पोलिसांनी बळाचा वापर करीत केंद्रीय मंत्री राणे यांना अटक केल्याचा आरोपही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला

उस्मानाबाद: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 25) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी महाआघाडी शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी ठाकरे सरकार मुर्दाबाद अशा घोषणाही भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलिसांनी बळाचा वापर करीत केंद्रीय मंत्री राणे यांना अटक केल्याचा आरोपही यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

तसेच जिल्ह्याचे सेनेचे खासदार आणि आमदार यांना चित्रपटातील 'रंगा बिल्ला' यांची उपमा देत घोषणाबाजी केली. याशिवाय काल ट्विटर वॉरमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस नितीन भोसले, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य सुधीर पाटील, विनोद कपाट यांसह अनेक कार्यकर्ते यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT