naredra patil naredra patil
मराठवाडा

अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षण गांभीर्याने घेतले नाही- नरेंद्र पाटील

सरकारने आरक्षण गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोपही नरेंद्र पाटील यांनी केला आहे

सकाळ वृत्तसेवा

बीड: समाजाला मिळालेले आरक्षण मराठा (maratha reseravtion) समाजाच्या ५८ मूक मोर्चांचे यश होते. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी समाजाचे आरक्षण गांभीर्याने घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांनी राग व्यक्त केला. आता आमदार विनायक मेटे यांच्या पुढाकारातून ता. पाच जूनला होत असलेल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चा: लढा आरक्षणाचा या आंदोलनाचे लोण राज्यभर पोहोचेल, असे माजी आमदार नरेंद्र पाटील (narendra patil) म्हणाले.

ता. पाच जूनला होत असलेल्या मोर्चाबाबत श्री. पाटील यांनी गुरुवारी (ता. तीन) पत्रकार परिषदेत भूमिका जाहीर केली. श्री. पाटील म्हणाले, आरक्षणामुळे समाजाची अनेक मुले स्पर्धा परीक्षा, वैद्यकीय, अभियांत्रिकी क्षेत्रात गेले. आरक्षणाला स्थगिती भेटल्यानंतर मेटेंसह अनेकांची शिष्टमंडळे सरकारला भेटले पण त्यांनी गांभीर्य दाखविलेच नाही, असे श्री. पाटील म्हणाले. तर तत्कालीन महायुती सरकारने आरक्षणासोबतच समाजाला दिलेल्या समांतर योजना आणि सवलतीही या सरकारने दोन वर्षांत हळूहळू कटकारस्थान करून बंद केल्या. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर अद्यापही सरकारने फेर याचिका दखल केली नाही. त्यामुळे या मोर्चातून सरकार विरोधातील असंतोष दिसणार आहे. दरम्यान, समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्या योजना, सोयी, सवलती देणार हे सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असे विनायक मेटे म्हणाले.

मराठा मंत्र्यांच्या तोंडात गुटका-खैनी-
ओबीसींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंत्री मंडळातील ओबीसी मंत्री आक्रमक झाले आहेत. सरकारला धारेवर धरत आहेत. याचवेळी मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांसह इतर मराठा मंत्री काहीच का बोलत नाहीत. त्यांच्या तोंडात गुटका आहे की खैनी? कळत नाही, असा टोलाही नरेंद्र पाटील यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT