National Agricultural Exhibition sakal
मराठवाडा

National Agricultural Exhibition : परभणीत २१ पासून राष्ट्रीय कृषी प्रदर्शन ; कुलगुरू डॉ. इंद्र मणी

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान व कृषी संशोधन पाहण्याची संधी मिळावी

सकाळ वृत्तसेवा

परभणी : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान व कृषी संशोधन पाहण्याची संधी मिळावी, यासाठी परभणी येथे २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान पश्चिम विभागीय कृषी मेळावा आणि कृषी प्रदर्शन होणार असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली. विद्यापीठ, आत्मा, कृषी विभागातर्फे हा उपक्रम होणार आहे.

विद्यापीठाच्या क्रीडा संकुल प्रांगणात हे कृषी प्रदर्शन भरणार आहे. मेळाव्यात पश्चिम भारतातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व गोवा या राज्यासह दीव - दमन आणि दादर नगर हवेली येथील शेतकरी बांधव, कृषीतज्ज्ञ, कृषी संशोधक, धोरणकर्ते, कृषी कंपन्या, कृषी अधिकारी, कृषी विस्तारक आणि कृषी उद्योजक हे हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. याद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधन पाहण्याची सुवर्णसंधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे.

दोनशेहून अधिक दालने

प्रदर्शनात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या २०० पेक्षा जास्त दालनांचा समावेश राहणार आहे. यात विशेषत: दर्जेदार बी - बियाणे, रोपे, खत, कीटकनाशके, इत्यादी दालनाचा यात समावेश असेल, असेही कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी सांगितले.

मेळाव्याचा मुख्य विषय हवामान अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी हा असेल. यात चर्चासत्रे, शास्त्रज्ञ - शेतकरी संवाद याद्वारे विविध विषयावर तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन होईल. मराठवाड्यातील शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी अधिकारी आणि कृषी विस्तारकांनी याचा लाभ घ्यावा.

— डॉ. इंद्र मणी, कुलगुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT