speeach sakal
मराठवाडा

Beed News : बीड येथील बलभीम महाविद्यालयातरसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या विभागांच्या वतीने राष्ट्रीय चर्चासत्र

शनिवारी डॉ. निमसे यांच्या हस्ते उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा

बीड : येथील बलभीम महाविद्यालयात शनिवारी (ता. २०) रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या विभागांच्या वतीने एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. उद्‍घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते होईल.

रसायनशास्त्र विभागाच्या सत्रांना हैदराबाद येथील पॉलिमार आणि फंक्शनल मटेरिअल डिव्हिजन आयआयसीटी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सिद्धनाथ भोसले, डॉ. संदीप भराटे, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथील रसायनशास्त्र विभागातील डॉ. गोविंद कोळेकर हे मार्गदर्शन करतील. तर, भौतिकशास्त्र विभागाच्या सत्रांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) येथील विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर एम. के. पाटील, जालना येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधील प्रोफेसर गिरीश जोशी व मुंबई विद्यापीठातील डॉ. प्रवीण वाळके मार्गदर्शन करतील.

गणित विभागाच्या सत्रांना बेल्लारी, कर्नाटक येथील विजयनगर श्रीकृष्ण देवराय विद्यापीठ येथील डॉ. अश्विनकुमार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) येथील गणित विभागाचे डॉ. नितीन दारकुंडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागप्रमुख डॉ. किर्तीवंत घडले हे मार्गदर्शन करतील. चर्चासत्रात सदर विषयांच्या प्राध्यापकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष उंदरे व संयोजकांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपरफुटीविरोधी विधेयकावर 'सीजेपी'ची पहिली प्रतिक्रिया; ''सरकारकडून केवळ शिक्षेवर फोकस पण गुन्हा कसा रोखणार?''

दहावी-बारावी उत्तीर्ण तरुणांना नोकरी! सोलापुरात आता ‘या’ कार्यालयात दरमहा दोनदा रोजगार मेळावे; मुलाखतीतून थेट जॉबची संधी, वाचा...

Baramati Smart Village: बारामती तालुक्यातील दहा गावांचा ‘स्मार्ट अँड इंटेलिजेंट व्हिलेज’ प्रकल्पातून तंत्रज्ञानाधारित सर्वांगीण कायापालट

Nagpur Exam Management: नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकपदी डॉ. अनुप पळसोकर; विस्कळीत परीक्षा व्यवस्थेला रुळावर आणण्याचे मोठे आव्हान

सोलापुरात ओळखीच्या चौघांनी सराफ व्यापाऱ्याला लुबाडले! ८४.५२ लाख रुपये आणि सव्वाकिलो दागिने लंपास; मनीलँडिंग अन्‌ गहाण ठेवलेल्या दागिन्यांमध्ये चौघांनी केला अपहार

SCROLL FOR NEXT