beed sakal
मराठवाडा

Natya Sammelan Beed : आता सुरू करावे लागतील मोबाइल व्यसनमुक्ती केंद्र ; धनंजय मुंडे नाट्यसंमेलनाचे उद्‌घाटन

आयुष्यात आलेली अनेक नाटकं भोगली, पण पहिल्यांदा मला विभागीय नाट्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळाली. जिल्ह्याने नाट्य क्षेत्राला अनेक नामवंत हिरे दिले, असे गौरवद्गार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले.

सकाळ वृत्तसेवा

बीड : आयुष्यात आलेली अनेक नाटकं भोगली, पण पहिल्यांदा मला विभागीय नाट्य संमेलनाचे उद्‌घाटन करण्याची संधी मिळाली. जिल्ह्याने नाट्य क्षेत्राला अनेक नामवंत हिरे दिले, असे गौरवद्गार कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी काढले. घराघरांत मोबाईलच्या माध्यमातून कलाकार तयार झाले आहेत. पण, येत्या पाच वर्षांत मोबाईल व्यसनमुक्त केंद्र सुरू करावे लागतील, अशी काळजी देखील मुंडे यांनी बोलवून दाखवली.

१०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलना निमित्त येथील दिवंगत केशरबाई क्षीरसागर नाट्यनगरीतील दिवंगत डॉ. सुहासिनी इर्लेकर रंगमंचावर शुक्रवारी (ता. दोन) विभागीय नाट्यसंमेलनाचे उद॒घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उद्योगमंत्री उदय सामंत होते. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, आमदार प्रकाश सोळंके, परिषदेचे कार्यवाह अजित भुरे, उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईल, अभिनेते सचित पाटील, परिषदेचे उपाध्यक्ष नरेश गडेकर, अभिनेत्री गौरी कुलकर्णी, सहकार्यवाह समीर इंदुलकर, सतीश लोटके, अभिनेत्री सविता मालपेकर, दिलीप कोरके, सुनिल ढगे, सुशांत शेलार, सिनेकलाकार विजय गोखले, संदीप पाठक, सचिन पाटील, पंढरीनाथ कांबळे, गौरी कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, सुधीर निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, बाजीराव धर्माधिकारी, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, मुख्याधिकारी निता अंधारे, स्वागताध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, परिषदेच्या बीड शाखाध्यक्ष डॉ. दीपा क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.

धनंजय मुंडे म्हणाले, केशवराव देशपांडे यांचे नाव घेतल्याशिवाय या नाट्य संमेलनाचे कार्य पूर्णच होऊ शकत नाही. बीडच्या मातीत कला आहे पण पाठीवर थाप द्यायला तो इथे येत नाही ही ही शोकांतीका असल्याचेही श्री. मुंडे म्हणाले. प्रशांत दामले यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले. सुत्रसंचलन शिप्रा मानकर, शोभा कुलकर्णी यांनी केले. डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले, दिवंगत केशरबाई क्षीरसागर यांननी पहिल्यांदा राजुरी येथे एक नाटक बसवून त्यात पुरुषाचा रोल केला होता. दिवंगत डॉ. सुहासिनी ईर्लेकर यांनी दिगदर्शित

केलेली अनेक नाटके गाजली. त्यांचाच हा वसा घेऊन आम्ही पुढे मार्गक्रमण करीत आहोत. शहरातील नाट्यगृहाच्या दुरूस्तीसाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी केली. या नाट्य संमेलनातून स्थानिक कलाकारांना यातून नक्कीच मदत होईल. येणाऱ्या काळात अशा प्रकारचे कार्यक्रम घेण्यासाठी यातून नक्कीच प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा डॉ. क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

विनोद व कोपरखळ्या

धनंजय मुंडे म्हणाले, २५ वर्षांपासून प्रशांत दामले यांना पाहतोय पण त्यांच्या चेहऱ्यावर तसू भर देखील फरक पडलेला नाही. ज्यांच्या नावात ‘शांत’ आहे, तरी प्रयोग करताना जे कधीच ‘दमले’ नाहीत. तुम्ही पडद्यावर करता आम्ही पडद्यामागे करतो. उदयजींना देखील वेगवेगळे पात्र करावे लागतात. 101 वे राज्याचे नाट्य संमेलन आमच्या परळीत करण्याची आमची तयारी आहे. सगळे कोकणात नेऊ नका, आम्हाला संधी द्या.

उदय सामंत यांनीही तुम्ही कलाकार तीन तास मेकअप करतात, पण आम्ही उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअप करतो. मतभेद जरी असले तरी हे नाट्य कलाकार सगळे विसरून काम करण्यासाठी पुढे येतात. त्यांचा आदर्श राजकारणी लोकांनी घेतला पाहिजे. बारामती ते मंत्रालय या नाटकात धनंजय मुंडे यांचा सहभाग होता. तर मुंबई, गुवाहाटी व्हाया सुरत या नाटकात मी होतो. मी पुन्हा येईल हे नाटक देखील आधी रचले होते.

नाट्यगृहासाठी निधी देऊ : सामंत

उदय सामंत म्हणाले, एमआयडीसी ते नाळवंडी रस्यासाठी आचासंहिता लागण्यापूर्वी सहा कोटी रुपयांचा निधी देऊ. तसेच, नाट्यगृहासाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्यासाठी पालकमंत्र्यांचीही शिफारस असून मागणी पूर्णत्वास नेऊ, असे त्यांनी सांगीतले. पवित्र लोक या रंग मंचावर कामे करतात. रंगभूमी ही बालरंग भूमी पासून विकसित व्हायला पाहिजे होती. बालरंग भूमीला ताकद दिली पाहिजे. नाट्यगृहावर सोलार लावले पाहिजेत. त्यामुळे नाट्यगृहाचे भाडे कमी करता येईल. व्हॉट्सॲप सोडून जेंव्हा चांगले लिहिणारे तयार होतील, त्यावेळी महाराष्ट्रातून सर्वात जास्त संहिता लेखन होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar यांना पुण्यातील महिलेचा सल्ला, दादा बघा काय म्हणाले? | Pune News | Manohar Parrikar | Sakal News

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

SCROLL FOR NEXT