मराठवाडा

जायकवाडीच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेत्यांना घेराव

प्रकाश बनकर

औरंगाबाद : जायकवाडीच्या हक्‍काच्या पाण्यासंदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.30) विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना घेराव घालत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन गोंधळ घातला. औरंगाबादेत दुपारी साडेतीन वाजता हा प्रकार घडला. 

काँग्रेसतर्फे राज्यभरात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येत आहे. मंगळवारी (ता.30) फुलंब्री, सिल्लोड येथे ही यात्रा जाणार होती. यात्रेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार अब्दुल सत्तार आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे आले होते. तत्पूर्वी माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्या निवासस्थानी भोजनासाठी ते थांबले होते. भोजन झाल्यानंतर फुलंब्रीला जाण्यासाठी वाहनाकडे जात असताना राधाकृष्ण विखे पाटील यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भोंगे, मयूर सोनवणेंसह इतर कार्यकर्त्यांनी घेराव घालत जायकवाडीच्या पाण्याबद्दल विचारणा केली. 

यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी मध्यस्थी करीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारले. यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत धक्‍काबुक्‍की झाली. याच वेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील हाय हाय... अशी घोषणाबाजी दिली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करीत घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेत बाजूला केले. त्यानंतर विखे पाटील व इतर नेते फुलंब्रीकडे रवाना झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT