Kannad Assembly Constituency Esakal
मराठवाडा

Kannad Assembly Constituency: कोणत्या पक्षाला सुटणार जागा; उमेदवारीच्या अपेक्षेने नितीन पाटील राष्ट्रवादीत

Assembly election 2024 : माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून, कन्नड विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र झाली आहे. या जागेसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक दावेदार सक्रिय झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कन्नड-सोयगाव : विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड समजला जातो. मात्र, लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना विजय मिळाला आणि ठाकरे गटाला तडे गेल्याचे दिसून आले.

सध्या या मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत यांना लोकसभेचा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा आहे. दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अनेक जण इच्छुक असल्याने, नेमकी ही जागा कोणाल सुटणार, यावरच पुढील समीकरणे अवलंबून आहेत.

आमदार राजपूत यांना शह देण्यासाठी शिवसेनेने भरतसिंग राजपूत यांना जिल्हाप्रमुख केले. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निष्ठावंत म्हणून भरतसिंग राजपूत व केतन काजे यांची ओळख आहे. माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना या विधानसभा मतदारसंघात मदत करून सिल्लोडमध्ये दानवे यांचा फायदा करून घ्यायचा, शिवसेनेत संजना जाधव यांना प्रवेश देऊन विधानसभेत उमेदवारी द्यायची, अशी रणनीती सत्तार यांनी आखल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत, तालुकाप्रमुख केतन काजे, बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड, केशव राठोड इच्छुक उमेदवार आहेत.

विरोधी आमदार उदयसिंग राजपूत एकमेव ओबीसी असल्याने याचा परिणाम निवडणूक निकालावर होईल, अशी भीती या शिवसैनिकांनी शिंदे यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. ईशा झा याही मैदानात उतरल्या. त्यामुळे जाधव यांच्या पारंपरिक मतांचे विभाजन अटळ आहे. सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार हेही अपक्ष म्हणून तयारीत आहेत, तर आपचे जिल्हाध्यक्ष सुभाष निकम यांनीही मोर्चेबांधणी केली.

महानुभाव पंथ व नातेसंबंध याच्या बळावर जनसंपर्क ठेवला आहे. सुभाष निकम, मनोज पवार, डॉ. अशोक पवार, इंजि. मिलिंद पाटील यांनी मनोज जरांगे यांच्याकडे बायोडेटा सादर केला. भाजपकडून डॉ. संजय गव्हाणे, जिल्हाप्रमुख संजय खंबायते, उत्तमराव राठोड हे प्रबळ दावेदार आहेत. ‘वंचित’कडून कृषिभूषण डॉ. सीताराम जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून कृषिभूषण भाऊसाहेब थोरात मैदानात उतरले आहेत.

उमेदवारीच्या अपेक्षेने माजी आमदार नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतोष कोल्हे व स्वाती कोल्हे यांनी नितीन पाटील यांच्यापुढे पक्षांतर्गत आव्हान उभे केले आहे. काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार नामदेव पवार तयारीत आहेत.

महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला ही जागा निश्चित समजली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातील इच्छुक अस्वस्थ आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाला येथे प्रबळ दावेदार आहे. जरांगे फॅक्टरमुळेही कन्नड विधानसभा मतदारसंघाचे समीकरण बदलण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

NHAI action on Toll Plaza: लष्करी जवानाला बेदम मारहाण प्रकरणात 'NHAI'चा संबधित 'टोल प्लाझा'ला जबरदस्त दणका!

Central Government: मोदी सरकार देणार १५ हजार रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

SCROLL FOR NEXT