NCP Ex MP Protests in Parbhani Municipal Corporation
NCP Ex MP Protests in Parbhani Municipal Corporation 
मराठवाडा

Video : राष्ट्रवादीच्या माजी खासदारांनी महापालिकेच्या पायरीवर...

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शहरातील बेबंद कारभाराचा आता लोकप्रतिनिधींनाही फटका बसत आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसेचे माजी खासदार सुरेश जाधव यांना आपल्या कॉलनीतील खराब रस्त्याकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी महापालिकेत येऊन आंदोलन करावे लागले. सुरेश जाधव यांनी आंदोलन करून महापालिकेच्या पायरीवरच ठिय्या मांडला.

माजी खासदार सुरेश जाधव हे कृषी सारथी कॉलनीत राहतात. त्यांच्या कॉलनीसह आजू- बाजूच्या कॉलन्यांमध्ये रस्त्याची पूर्णत: वाताहत झाली आहे. त्यांच्याच घरासमोर गुडघाभर खोल खडडे पडल्याने या परिसरात जाणे येणे अवघड झाले.

श्री. जाधव यांनी या संदर्भात महापालिकेच्या आयुक्तांना वेळोवेळी खड्डे बुजविण्याची विनंती केली. परंतु या बाबीकडे ना आयुक्त लक्ष देत आहेत ना नगरसेवक लक्ष देत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या माजी खासदार सुरेश जाधव यांनी महापालिकेत येऊन आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला.

सध्या महापालिकेवर कॉग्रेसची सत्ता आहे. त्या ठिकाणी काही काळ बसल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या मुख्य दरवाज्यात येऊन ठाण मांडले. या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. अखेर कॉग्रेसचे माजी मंत्री आमदार सुरेश वरपुडकर यांनी महापालिकेत येऊन सुरेश जाधव यांचा राग शांत केला. त्यांच्या कॉलनीतील रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे आदेश महापौर मीना वरपुडकर यांनी संबंधितांना दिल्यानंतर माजी खासदार सुरेश जाधव  यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले.

सत्ता आपली असतांनाही हाल होताहेत

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना सुरेश जाधव यांनी महापालिकेच्या कारभारावर कडक शब्दात ताशेरे ओढले. शहरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून त्याकडे कुणाचेही लक्ष नाही. महापालिकेतील नगरसेवक कोणतेही कामे करत नाही. केवळ आश्वासनाची खैरात करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

महापालिकेत कॉग्रेस - राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता असतांनाही मित्र पक्षातील लोकप्रतिनिधीचे कुणी ऐकत नसतील तर या सत्तेचा काय उपयोग. आपली सत्ता असतांनाही हाल भोगावे लागत आहेत असे म्हणत त्यांनी कॉग्रेसला घरचाच आहेर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT