तीन कंत्राटदार पूर्ण करणार औरंगाबाद-जळगाव महामार्ग

letest News About Jalgaon-Aurangabad road
letest News About Jalgaon-Aurangabad road

औरंगाबाद - औरंगाबाद-जळगाव महामार्गाच्या कामाचा प्रश्‍न आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार असल्याची चिन्हे आहे. मार्चमध्ये पळून गेलेल्या कंत्राटदारानंतर या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. याविषयी जगभर नाचक्‍की झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणात लक्ष दिले होते. त्यानंतर आता या रस्त्याचे काम तीन कंत्राटदारांना ठेकेदारांना देण्यात आले आहे. यामुळे कामाला गती येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. 

औरंगाबाद-जळगाव या दीडशे किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु झाले. मात्र काम घेतलेल्या ऋत्विक एजन्सीने काम अर्धवट सोडून पळ काढला. यामुळे औरंगाबाद ते जळगावपर्यंतचा रस्त पूर्णपणे खोदून ठेवण्यात आला आहे. या रस्त्यामुळे अनेक अपघात झाले. दिवाळीच्या काळात झालेल्या परतीच्या पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाला. अनेक ठिकाणी बस, ट्रक व इतर वाहने अडकून पडली होती. त्यानंतर आता या रस्त्याच्या कामासाठी तीन कंत्राटदारांना तीन टप्प्यात याचे काम देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दानवे यांनी दिली. 
  
वाहनधारकांची फरफट 
औरंगाबादेतून जळगावला जाणाऱ्यांना कन्नड-चाळीसगावमार्गे जावे लागते. तर सिल्लोड-सोयगावला जाणाऱ्यांना फुलंब्री-बाबरा, तर भोकरदन इतर मार्गाने जावे लागत आहे. या रस्त्याची तक्रार अनेकांनी ट्‌विटरवरून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. याची दखल घेत त्यांनी आठ दिवसात रस्त्यांची स्थिती सुधारण्याचे आदेश एमएसआरडीला दिले होते. त्यानंतर तत्काळ काम सुरु झाले. 

हे तीन कंत्राटदार करणार काम 
ऋत्विक एजन्सीने पळ काढल्यानंतर या प्रकरणाची थेट औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली होती. आता हे काम आर. के. चव्हाण, आर. एस. कामटे आणि स्पायरा इन्फ्रा भटनागर या तीन कंत्राटदारांना देण्यात आले आहे. औरंगाबाद-सिल्लोडपर्यंत- आर. के चव्हाण तर सिल्लोड-फर्दापूर-आर एस. कामटे, फर्दापूर ते जळगाव- स्पायरा इन्फ्रा भटनागर हे काम करणार
आहेत, अशी माहिती श्री. दानवे यांनी दिली. 

चौपदरीकरणाचे मॉनिटरिंग  
रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीसह रखडलेले चौपदरीकरणाचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने महामार्ग विभागाने नियोजन सुरू केले आहे. रस्त्याची एक बाजू खुली ठेवत दुसऱ्या बाजूने कॉंक्रिटीकरण, डांबरीकरण अशा टप्प्यात काम करण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com