ncp jitendra awhad statue burnt over lord shri ram offensive statement Sakal
मराठवाडा

Jitendra Awhad : गंगापूरात जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून निषेध

जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मोठी घोषणाबाजी करण्यात आली

बाळासाहेब लोणे

गंगापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामाबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानावरुन शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप व हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध मोठी घोषणाबाजी करण्यात आली.भाजपचे नेते प्रदीप पाटील म्हणाले की, २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि मंदिराचा सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

या संदर्भात आव्हाडांचे वक्तव्य निंदनीय आहे. साडेपाचशे वर्षांपासून ज्या अमृत सोहळ्याची संपूर्ण देश वाट पाहत आहे, त्या सोहळ्याला गालबोट लावण्याचे काम जितेंद्र आव्हाडांसारखे नेते करत आहेत. त्यांनी प्रभू रामाबद्दल केलेले अक्षम्य विधान खपवून घेतल्रे जाणार नसल्याचे ते म्हणाले.

आंदोलनात भाजपचे नेते प्रदीप पाटील, तांडा सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र राठोड अतुल रासकर, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव धनायत, दीपक साळवे, भारत पाटील, अशोक मंत्री, हिंदुत्ववादी संघटनेचे चंद्रकांत लांडे, श्रीकांत नावंदर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी सहभाग नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT