NEET Exam esakal
मराठवाडा

NEET Exam Paper Leakage : मुख्य म्होरक्या मराठवाड्यातलाच! शोधासाठी पोलिसांचे पथक दिल्ली, डेहराडूनला रवाना

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानंतर येथील पोलिसांनी दोघाना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

लातूर - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानंतर येथील पोलिसांनी दोघाना अटक केली. त्यांच्या चौकशीत काही बाबी समोर येत आहेत. यातील मुख्य म्होरक्याचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे एक पथक दिल्ली, डेहराडूनला गेले. गंगाधर गुंडे असे त्याचे नाव असून तो मराठवाड्यातीलच आहे. तो दिल्लीत वास्तव्यास असून तेथूनच तो सर्व काही करीत असल्याचे समोर आले आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी काही पालक, विद्यार्थ्यांना बोलावून चौकशी केली आहे. या प्रकारात मोठी आर्थिक उलाढाल असल्याचा संशय आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी मूळ येथील रहिवासी व सोलापूर जिल्हा परिषदे शाळेचा शिक्षक संजय जाधव व लातूर जिल्हा परिषदे शाळेचा मुख्याध्यापक जलील पठाण यांना अटक केली आहे. या दोघांनाही दोन जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील म्होरक्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक दिल्ली तसेच डेहराडूनला गेले आहे.

पालक, विद्यार्थ्यांशी संपर्क

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बीड जिल्ह्यात गेले होते. या जिल्ह्यातील काही पालक व विद्यार्थ्यांनी अटक करण्यात आलेल्या संशयितांसोबत व्यवहार केल्याचा संशय पोलिसाना आहे. यातून दहा पालक व विद्यार्थ्यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. त्यांचे जवाबही नोंदवण्यात आले आहेत. यातील बहुतांश पालक हे शिक्षक असल्याचे समोर आले आहे.

‘एटीएस’ने सोडलेल्याचा शोध

या प्रकरणात ‘एटीएस’ने पहिल्यांदा दोघांना अटक केली होती. तसेच या प्रकरणातील आणखी एक इराण्णा कोनगलवार हा अन्य एक संशयित लातूरचाच आहे. तो उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत आहेत. त्याला ‘एटीएस’ने पहिल्यांदा ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मोबाईलही जप्त करण्यात आले होते. पण नंतर त्याला सोडून दिले गेले. आता त्याचाही शोध स्थानिक पोलिस घेत आहेत.

संशयितांकडे किती ‘माया’?

या प्रकरणात अटक केलेल्या दोघांची पोलिसाकडून कसून चौकशी सुरु आहे. मिळणाऱ्या माहितीची सांगड घालून पोलिस तपास करीत आहेत. तसेच या दोघांनी कोट्यवधीची माया जमवल्याचा संशय असून ती कोठे कोठे ठेवली आहे, याची माहितीही पोलिस यंत्रणा घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT