Latur 2 teachers 
मराठवाडा

NEET Paper Leak: 50 लाख द्या अन् पेपर घ्या! लातूरचे 'रॅकेट पॅटर्न'; 2 शिक्षकांसह चौघांवर गुन्हा, एक शिक्षक फरार

Latur Racket NEET Paper Leak 2 teachers : शिक्षक धाराशिवमार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याचं समोर आलं आहे. यात आतापर्यंत चार नावे समोर आली आहेत. यातील एक आरोपी हा दिल्लीचा असल्याची माहिती आहे.

कार्तिक पुजारी

लातूर- नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. लातूरमधून रविवारी दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले होते. या दोन्ही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासह इतर दोघांवर देखील लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील एका शिक्षकाला अटक करण्यात आलीये, तर दुसरा शिक्षक फरार आहे.

शिक्षक धाराशिवमार्गे दिल्लीला पैसे पाठवत असल्याचं समोर आलं आहे. यात आतापर्यंत चार नावे समोर आली आहेत. यातील एक आरोपी हा दिल्लीचा असल्याची माहिती आहे. जलील पठाण याला अटक करण्यात आलीये, तर संजय जाधव हा फरार झाला आहे. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. काल ताब्यात घेण्यात आलेला संजय जाधव आज फरार कसा झाला असा प्रश्न विचारला जात आहे.

नीट परीक्षेदरम्यान मोठा गैरप्रकार झाल्याचं समोर येत आहे. देशभरातील विविध राज्यात याप्रकरणी कारवाई केली जात आहे. पेपरफुटीचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. असे असतानाचा पेपरफुटीचे राज्यातील लातूर कनेक्शन समोर आले आहे. यात लातूरमधील दोन शिक्षकांचा सहभाग असल्याचं समोर येत आहे. दोन्ही शिक्षक जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, पीएचडी धारक आहेत आणि स्वत:चे कोचिंग क्लासेस देखील चालवतात.

दोन्ही शिक्षकांची पोलिसांनी रविवारी कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपींच्या मोबाईलवर हॉलतिकिट आणि काही आर्थिक व्यवहार झाल्याचं दिसून आलंय. त्यानंतर त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. एकाला अटक झालीये, तिघांचा शोध सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ४० ते ५० लाख रुपये देऊ शकतील अशा पालकांना संपर्क साधला जात होता. पैसे दिल्यास पेपर आधीच पुरवला जाईल. पालकांना ७२० पैकी ६५० गुण मिळवून देण्याची हमी दिली जायची.

आतापर्यंत बिहार, पंजाब, गुजरात आणि हरियाणा राज्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाली आहे. आता महाराष्ट्रातही याचे धागे-दोरे सापडले आहेत. याप्रकरणी आणखी काही नावे समोर येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: सीएसडीएसचे संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT