File Photo 
मराठवाडा

त्या 25 जणांचा आहवाल निगेटीव्ह, प्रशासनाने सोडला सुटकेचा श्‍वास

शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातून २५ संशयितांच्या घशातील लाळेचे (स्वॅब) नमुने गुरुवारी (ता. नऊ एप्रिल २०२०) औरंगाबादच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शुक्रवारी (ता. १० एप्रिल २०२० ) सायंकाळपर्यंत सर्वांचे अहवाल प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र, औरंगाबादच्या प्रयोग शाळेतील ‘कोरोना’ टेस्टींग किटस् संपल्याने ‘त्या’ पंचवीस संशयितांच्या अहवालाची प्रतिक्षा दोन दिवस लांबणीवर पडल्याने प्रशासनाची चिंता वाढली होती.    

पूर्वी नांदेडच्या सर्व संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात येत होते. त्यामुळे जा-ये करण्यात २० तासापेक्षा जास्त वेळ वाया जात होता. अर्थात २४ तासानंतर आहवाल प्राप्त होत असे, अहवाल येण्याचा वेळ कमी व्हावा आणि १२ तासाच्या आत आहवाल कसा प्राप्त व्हावा म्हणून स्वॅब तपासणी लॅब औरंगाबाद येथे सुरु करण्यात आली. मात्र या ठिकाणच्या लॅबवर कामाचा प्रचंड लोड येत असल्याने ‘कोरोना’ स्वॅब तपासणी मशिन बंद पडत आहे तर, कधी किटचा तुटवडा निर्माण होत असल्याने अहवाल प्राप्त होण्यास उशीर होतो आहे.   

हेही वाचा- अत्यावश्यक कामासाठी सुधारीत आदेश
लांबलेला आहवाल आला

नांदेडहून पाठविलेले कोरोना संशयितांचे स्वॅब अपेक्षित वेळेत मिळत नसल्याने नांदेडचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे तक्रार देखील केली होती. त्यामुळे दोन दिवस लांबणीवर जाणारा आहवाल काही तासाच्या आत मिळाला आहे, अशी माहिती डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली आहे.  

हेही वाचा- लॉकडाऊनच्या काळात गावठी दारुचा महापूर
प्रशासनाला सहकार्य करा

नांदेडहून पाठविलेल्या ‘त्या’ २५ संशयितांचे स्वॅबचे अहवाल तीन दिवसांनी का होईना पण हे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ही नांदेडकरांसाठी आनंदाची बाबा असली तरी, नांदेडकरांनी अजुन काही दिवस प्रशासनाला सहकार्य करून विनाकारण घराबाहेर पडणे टाळायला पाहिजे. अत्यावश्यक काम असेल तरच नागरिकांनी घराच्या बाहेर पडावे असे आवाहनही डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

अजुन ११ जणांचा आहवाल प्रलंबित
शुक्रवारी (ता.१० एप्रिल २०२०) रोजी पुन्हा ११ संशयितांच्या घशातील लाळेचे (स्वॅब) नमुने घेऊन ते औरंगाबादला तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शनिवारी उशिरापर्यंत या ११ व्यक्तींचा आहवाल प्राप्त होणार आहे. 
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT