Trees Protect Environment sakal
मराठवाडा

Trees Protect Environment : पर्यावरणासाठी नेटिझन्सचे सोशल मीडियाद्वारे आवाहन

रस्ता, घर बनवण्यासाठी झाडांची बेसुमार कत्तल केली जाते. उन्हाळ्यात प्रत्येकाला सावलीत वाहन लावण्यासाठी जागा हवी असते. पर्यावरण संवर्धनाच्या दिवशी झाड लावण्याचे सर्वच आवाहन करतात. मात्र, प्रत्यक्षात झाडे लावण्यासाठी कोणीच पुढे येत नाही.

सकाळ वृत्तसेवा

बीड : रस्ता, घर बनवण्यासाठी झाडांची बेसुमार कत्तल केली जाते. उन्हाळ्यात प्रत्येकाला सावलीत वाहन लावण्यासाठी जागा हवी असते. पर्यावरण संवर्धनाच्या दिवशी झाड लावण्याचे सर्वच आवाहन करतात. मात्र, प्रत्यक्षात झाडे लावण्यासाठी कोणीच पुढे येत नाही. झाड लावले तरी त्याचे संवर्धन होत नाही. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून घातक असलेल्या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी यंदा सोशल मीडियावर ‘एप्रिल फुल नव्हे, कूल करूया’ अशी हाक नेटिझन्सकडून देण्यात आली.

यंदा मार्चच्या शेवटी-शेवटी मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा पारा चाळिशी पुढे सरकला. रात्रीच्या तापमानातही वाढ झाली असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी कत्तल. पर्यावरणासंदर्भात जागरूकता नसणे, त्यामुळे दिवसेंदिवस मराठवाड्यातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात मराठवाड्यात ही सर्वाधिक तापमान असते; तसेच पाण्याचा प्रश्नही गंभीर असतो.

मराठवाडा ‘कूल’ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. त्यासाठी सोशल मीडियावर नेटिझन्सकडून आवाहन केले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात एप्रिलमध्ये झाडे लावली तर जगतील का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात वेगवेगळ्या झाडांच्या बियांचे संकलन करून या मोहिमेत सहभागी होता येते.

पर्यावरण संवर्धनासाठी येथील निसर्गमित्र संस्थेसह विविध संस्थांनी नेहमीच सक्रिय पुढाकार घेतला आहे. सर्व घटकांच्या संघटित प्रयत्नांतून कडुनिंब, आंबा, बेल, जांभूळ, चिंच, बाभूळ, आपटा, चिकू आदी बियांचे संकलन केले जाईल. या उपक्रमांतर्गत सहभागी झालेल्यांना या बिया कशा रुजवाव्यात, त्यांच्यापासून रोपटी कशी तयार करावीत, याची माहिती दिली जाते. उन्हाळ्याच्या सुटीत विद्यार्थी उपक्रमात सक्रिय सहभागी होतात.

संकलित झालेल्या बिया सामाजिक वनीकरण विभागाकडे दिल्या जातात. तेथे बिया रुजवून त्याची रोपे तयार केली जातात. दैनंदिन भ्रमंतीबरोबरच पदभ्रमंती, गड-किल्ले भ्रमंती आणि विविध शिबिरांसाठी बाहेरगावी गेल्यानंतर त्या-त्या परिसरातील विविध झाडांच्या बिया संकलित करूनही अशा उपक्रमात सक्रिय सहभागी होता येते.

बिया संकलन करताना...

  • पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या फळांच्या बियांचे संकलन करावे

  • ओल्या असणाऱ्या बिया उन्हात चांगल्या वाळवाव्यात

  • पर्यटनासाठी गेल्यानंतर तेथील वेगवेगळ्या झाडांच्या बिया संकलित कराव्यात

‘एप्रिल फुल’ म्हणजे काय?

मार्च महिना हा आर्थिक घडामोडींचा शेवटचा महिना असतो. बॅंक, कंपन्यांसह अनेक संस्थांची वर्षभराची आर्थिक हिशेबाची कामे या महिन्यात पूर्ण केली जातात. त्यावेळी कामात गुंतलेले कर्मचारी प्रचंड थकून गेलेले असतात. त्यांचा थकवा घालविण्यासाठी काहीतरी विरंगुळा करावा, यासाठी ‘एप्रिल फुल’ ही प्रथा रूढ झाली, असे म्हटले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro 2B: मेट्रो-२ बीचा पहिला टप्पा कधी सुरू होणार? तारखेबाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या मार्ग...

Thane News: नागरिकांनो सावधान! दिवाळीच्या उत्साहात पाकिटमारांचा हैदोस, पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

मुलगा झाला हो ! ऐन दिवाळीत राघव - परिणितीने दिली आनंदाची बातमी

Jalgaon Airport : जळगाव विमानतळाचा विकास ठप्प; प्राधिकरण व्यवस्थापन समितीची बैठक ८ महिन्यांपासून नाही

Shanivarwada Controversy : शनिवारवाड्यासमोर तणाव वाढला! 'त्या' व्हिडीओनंतर मेधा कुलकर्णींसह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

SCROLL FOR NEXT