Udgir Corona Updates, Latur 
मराठवाडा

कोरोना ः उदगीरात'ते' सातजण नव्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या संपर्कातीलच

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : शहरातील किल्लागल्ली परिसरातील नवीन कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या तीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. या रूग्णांच्या संपर्कातील व नात्यातील काही नागरिकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या नव्या कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्याच्या संपर्कातील आणखी सातजणांना कोरोनाची लागन झाल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सतीश हरिदास यांनी दिली आहे.


शहरात रविवारपर्यंत कोरोना संसर्गाचे दहा रुग्ण होते. सोमवारी त्यात भर पडून रुग्णांची संख्या १३ झाली आहे. बुधवारी (ता.सहा) ही संख्या वीसवर पोचली. सोमवारी (ता.चार) पॉझिटिव्ह आलेले तीन रुग्ण हे मृत महिलेच्या घर परिसरातील असले तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असतानाही या रुग्णांना कोरोनाची लागण झाली कशी? याचा तपास आरोग्य विभागाकडुन घेतला जात आहे.


मृत महिलेच्या संपर्कातील व नात्यातील अनेक जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. या कुटुंबाच्या संपर्कातील व नात्यातील तपासलेल्या नागरिकांपैकी दहा जणांना त्यांच्या संपर्कातून कोरोणाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याचे मूळ संपर्क बोधन निजामाबाद येथील असल्याचेही उघड झाले होते. मात्र या महिलेच्या कुटुंबातील संपर्कातील नागरिकांचे स्वॅब हे निगेटिव्ह येत असल्याने ही आरोग्य विभागासाठी समाधानाची बाब मानली जात आहे. मुसानगर येथील गुजरातेतून आलेल्या एक जणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाईकांचे स्वॅब तपासणी केली असता त्याचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत.


मात्र किल्ला गल्ली परिसरातील नव्या कौटुंबिक पार्श्वभूमीच्या कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबाच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल बुधवारी (ता.सहा) पॉझिटिव्ह आल्याने उदगीरकरांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. या नवीन कौटुंबिक पार्श्वभूमीच्या नागरिकांना नेमके लागण झाली कोठून? कोणाच्या संपर्कातून ही लागण झाली? लागण झालेले हे रुग्ण किती नागरिकांच्या संपर्कात गेले? त्यांची युद्धपातळीवर तपासणी करण्यात येत असून आवश्यक असणाऱ्यांचे स्वॅब घेऊन ते लातूरला तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत असे डॉ. हरिदास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT