Latur Corona News
Latur Corona News 
मराठवाडा

लातूर शंभरीच्या अन् जिल्हा तीनशेच्या उंबरठ्यावर, कोरोनाचा वाढता आलेख

सुशांत सांगवे

लातूर  : कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना लातूर शहर आणि जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शनिवारी (ता. २७) आढळून आले. इतक्या मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह अहवाल येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या शंभरीच्या उंबरठ्यावर पोचली आहे, तर जिल्ह्याने तीनशेचा टप्पा ओलांडला आहे. ही वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाकडून नवी पावले टाकली जाणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
टाळेबंदी मागे घेतल्यानंतर शहराच्या आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागले आहेत.

दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. रुग्णसंख्या कमी असताना शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावला जात होता. मास्क अनिवार्य करण्यात आला होता; पण आता रुग्णसंख्या वाढत असताना प्रशासनाकडून फारशा हालचाली होताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे लक्ष प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. सध्या जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३०७ झाली आहे, तर शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९३ वर पोचली आहे. ३०७ पैकी १९८ जण उपचार घेऊन बरे झाले, तर सध्या जिल्ह्यातील ९३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान आजवर १६ जणांचा मृत्यू झाला आहे.

पाचशे हेक्टरावरील पेरलेले सोयाबीन गेले वाहून, मोटेगाव परिसरात ढगफुटी

तीन वर्षांच्या मुलीला कोरोना
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत एकूण २११ व्यक्तींचे स्वॅब शनिवारी (ता. २७) तपासणीसाठी आले होते. त्यातील १७१ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले, तर २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. नऊजणांचे अहवाल अंतिम आले नाहीत. तर दोनजणांचे अहवाल रद्द करण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या लातुरातील व्यक्ती भीमनगर, सुळ गल्ली, शिवनगर, झिंगणप्पा गल्ली, क्वाईलनगर, शिवकृपा कॉलनी, गंगापूर, खाडगाव येथील, तर उर्वरित एक व्यक्ती मिरकल (ता. बसवकल्याण, जि. बिदर) येथील आहे. अहमदपूरमधील धानोरा येथील सातजणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. औसा तालुक्यातील भेटा (सहा), बुधोडा (एक) आणि सारोळा (दोन) येथील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय, उदगीरमध्ये चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात सुभाष रस्ता, देगलूर रस्ता, बेनशेळकी रस्ता आणि रावणगावचा समावेश आहे.


परदेशातून आलेला निघाला कोरोनाबाधित
मागील आठवड्यात कतार देशातून काही नागरिक लातुरात आले होते. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता परदेशातून आलेल्या आणखी एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. ही व्यक्ती किर्गिझस्तान देशातील बिश्केक शहरातून लातुरात आली आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT