संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

औरंगाबादमधून सुरू झाल्या नवीन विमानसेवा

अनिल जमधडे

औरंगाबाद - शहरातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू होत आहे. येत्या काळात आणखी विमानसेवा सुरू होणार असल्याने, भविष्यात शहरातील पर्यटन आणि उद्योग व्यवसाय भरारी घेऊ शकतो. त्यामुळे अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. 

चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुसज्ज असताना औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू होत नव्हती. काही दिवसांपूर्वी हेच चित्र होते. जेट एअरवेजची मुंबई सेवा बंद पडल्यापासून केवळ एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-दिल्ली ही एकमेव विमानसेवा सुरू होती. पर्यटनाची राजधानी, जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी, सोबतच निसर्गाने नटलेल्या औरंगाबाद शहरात विमानसेवा नसल्याने पर्यटकांनी अक्षरश: पाठ फिरवली होती. म्हणूनच नवीन विमानसेवा सुरू होण्यासाठी हॉटेल व्यावसायिक सुनीत कोठारी, जसवंतसिंग यांच्यासह विविध उद्योजक संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्याला यश येत आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर स्पाईस जेटने औरंगाबाद-दिल्ली ही विमानसेवा सुरू केली आहे. या पाठोपाठ आता एअर इंडियाने औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 16 ऑक्‍टोबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याने औरंगाबादकर सुखावले आहेत. विशेष म्हणजे सोळा वर्षांपूर्वी अत्यंत क्षमतेने ही विमानसेवा सुरू होती. सोळा वर्षांपासून बंद पडलेली ही विमानसेवा एअर इंडियाने पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने औरंगाबाद शहर हे पुन्हा उदयपूरला विमानसेवेने जोडले गेले आहे. विशेष म्हणजे ही सेवा मुंबई-औरंगाबाद-उदयपूर अशी असल्याने मुंबईलाही सकाळच्या वेळेत विमानाची सोय झाली आहे. या नंतर 27 ऑक्‍टोबरपासून स्पाईज जेट कंपनी औरंगाबाद-हैदराबाद ही विमानसेवा सुरू करणार आहे. या विमानसेवेमुळे हैदराबादला जाणाऱ्या व्यापाऱ्यांसह प्रवाशांची सोय होणार आहे. 
 
या कंपन्या तयारीत 
नवीन तीन विमानांच्या पाठोपाठ येत्या काळात इंडिगो, ट्रुजेट, झूम एअरवेज अशा काही कंपन्या औरंगाबादहून विविध ठिकाणी विमानसेवा सुरू करण्याच्या तयारीत असल्याने औरंगाबादकरांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत. 
  
माहितीचे फलक झळकले 
चिकलठाणा विमानतळावरून हैद्राबाद, उदयपूर, दिल्लीसाठी नव्याने सेवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या सेवांची माहिती व कोणत्या कंपन्यांमार्फत सेवा पुरविण्यात येत आहे. याची माहिती देणारे बोर्ड विमानतळाबाहेर लावण्यात आले आहेत. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन, औरंगाबाद फर्स्ट आणि भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्यावतीने हे बोर्ड लावण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT