file photo 
मराठवाडा

चोरट्यांची नविन शक्कल, तोडले सीसीटीव्हीचे वायर 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : चोरट्यांनी आता नविनशक्कल लढवत नांदेड शहारत घरफोडी, चोरीचे गुन्हे घडवित आहेत. असाच एक प्रकार डॉक्टर्सलेन परिसरात मंगळवारी (ता. सात) रात्री घडला. अज्ञात चोरट्यांनी तिन औषधी (मेडीकल) दुकान फोडून २१ हजाराचा ऐवज लंपास केला. आता हे नवे आव्हान पोलिसांसमोर आले आहे. 

शहराच्या कलामंदिर परिसरात डॉक्टर्सलेन आहे. या भागात विविध आजारावरील रुग्णालये आहेत. रुग्णालय म्हंटले की औषधी दुकान आलीच. त्याच धर्तीवर अनेक मेडीकल दुकाने आहेत. मंगळवार (ता. सात) जानेवारीच्या रात्री या भागातील वर्दळीच्या ठिकाणी, नेहमी रात्रभर लोकांचे काही ना काही कारणाने येणे जाणे असते. अशा भागात असलेली मेडीकलची दुकाने अनुक्रमाने राज मेडीकल, कैलास एजन्सी आणि श्री दत्तकृपा एजन्सी अशी दुकाने फोडली. या सर्व दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत.

चोरट्यांची नविन शक्कल
चोरी करतांना आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये येऊन पोलिसांना सापडणार नाही याची पुरेपुर काळजी चोरट्यांनी घेतली. त्यांनी चक्क सीसीटीव्हीचे वायर तोडले. त्यानंतर ही दुकाने फोडली. मेडीकल दुकानांना फोडलेल्या एका दुकानातून १७ हजार रुपये रोख रक्कम आणि दुसऱ्या दुकानातून चार हजार रुपये लंपास केले. तिसऱ्या दुकानात चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. ही बाब बुधवारी (ता. आठ) दुकान मालकांच्या लक्षात आली. त्यांनी वजिराबाद पोलसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली. पोलिसांच्या श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले. या दुकानफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिमायतनगर भागात वाटमारी
नांदेड शहरासह हिमायतनगर येथे सरसम फाटा आंदेगाव रस्त्यावर मोटारसायकलवर प्रवास करणाऱ्या सुर्यभान राजाराम थोटे यांचा रस्ता अडवून चोरट्यांनी त्यांच्याकडून ७५ हजार ५०० रुपये जबरीने चोरून नेली आहे. सुर्यभान हे सोयाबीनचे पैसे घेऊन घराकडे पायी निघाले. यावेळी त्यांच्या पाठीमागून एक अनोळखी दुचाकीस्वार आला. काका, चला मी तुम्हाला सोडतो असे म्हणून आपल्या दुचाकीवर घेतले. काही अंतरावर गेल्यानतंर त्यांने दुचाकी थांबविली. श्री. थोटे यांना माराहण करून त्यांच्याजवळची वरील रक्क्म घेऊन पोबारा केला. याप्रकणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. 

मुखेड बसस्थानकावर चोरी
मुखेड येथे बसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका महिलेच्या भोवती अनोळखी तीन चोर महिलांनी गर्दी केली. यातच सुलोचना माधवराव गायकवाड यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केली. त्यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT