फोटो 
मराठवाडा

अत्यावश्यक सेवेसाठी नवीन हेल्पलाइन आणि ई-मेल कार्यान्वीत- एसपी विजयकुमार

प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील जनतेला लॉकडाऊनच्या काळात त्रास होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. जीवघेण्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून आता नागरिकांना अत्यावश्यक वस्तू पुरविण्याच्या अनुषंगाने नवीन पाच हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. शिवाय नवीन ई- मेल ही कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या संकल्पनेतून या हेल्पलाइन सुरू करण्यात आले आहेत. 

जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे

नागरिकांनी या नव्या हेल्पलाईनचा उपयोग करावा. घरातच राहून पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.
अत्यावश्यक सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने १०० क्रमांकच्या पाच हेल्पलाइन सुरू करण्यात आल्या होत्या. १०९१ व नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांकही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवेच्या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा

अत्यावश्यक वस्तू आणि वाहतूक तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात 75 62 92 51, 99 75 62 92 79, 99 75 62 98 37 आणि 99 75 62 89 69 ही पाच क्रमांक देण्यात आले आहेत. यात अत्यावश्यक वस्तू, वाहतूक तक्रारी, वैद्यकीय गरजा, शेतीविषयक तक्रारी आणि कंपनी विषयक तक्रारींचा समावेश असणार आहे. नागरिकांनी अत्यावश्यक सेवेच्या हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा आणि घरातच राहून कोरोना हरविण्यासाठी पोलिस प्रशासन व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे.

आपत्कालीन सेवा : अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा

नांदेड : आपत्कालीन कार्यात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करुन पास घेण्याची सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केली आहे. https://covid19.mhpolice.in या लिंकवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

ई- पास E Pass ची सुविधा ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने
उपलब्ध करुन दिली असून  अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सदर लिंकवर आपला पासपोर्ट साईजचा फोटो २०० केबीपर्यंत तसेच इतर कागदपत्रे ५०० केबीपर्यंत अपलोड करावीत. पास वापरासंदर्भातील नियमावली फॉर्म भरण्यापूर्वी वेब लिंकवर दिसून येते. अर्ज केवळ इंग्रजी भाषेत स्विकारला जाणार असून अर्ज भरल्यानंतर मंजूर अर्जाची प्रत डाउनलोड करावी. त्याची ऑनलाईन प्रत सर्वांना सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होऊ शकते. आपत्कालीन सेवा देणाऱ्यांसाठी ही सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT