file photo 
मराठवाडा

चोरट्यांची नविन वर्षात पोलिसांना सलामी 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सिडको भागात नविन वर्षाच्या पूर्व संध्येला चोरट्यांनी पोलिसांना घरफोडी करून सलामी दिली. या चोरट्यांनी चक्क पावणेदोन लाखाची घरफोडी केली. अज्ञात चोरट्यांविरुध्द नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सिडको भागातील दत्तनगरमध्ये राहणारे केशव पुंडलीक कोलते (वय ४१) हे कौठा येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये नोकरी करण्यासाठी सोमवारी (ता. ३०) रात्री आले होते. घरी परिवार नसल्याने त्यांनी आपल्या घराला कुलूप लावून ते कर्तव्यावर आले. मात्र तिकडे अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा फेऊन मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरात घुसून कपाटातील नगदी ४२ हजार रुपये व एक लाख २० हजाराचे सोन्याचे दागिणे असा एक लाख ६२ हजाराचा ऐवज लंपास केला. बुधवारी (ता. एक) सकाळी केशव कोलते हे आपल्या घरी परत गेले असता त्यांच्या हे लक्षात आले. त्यांनी आपल्या घरात जावून पहाणी केली असता अज्ञात चोरट्यांनी पूर्ण घर साफ केले होते. 

पोलिसांचा ताफा घटनास्थळी

लगेच त्यांनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात जावून घरफोडी झाल्याचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना सांगितले. लगेच श्री. कच्छवे यांनी घटनास्थळ गाठून पहाणी केली. मात्र चोरट्यांनी आपला कुठलाच माग मागे ठेवला नसल्याने पोलिसांनी पंचनामा करून माघारी फिरले. केशव कोलते यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. थोरात करीत आहेत. 

कंधारमध्येही घरफोडी

कंधार तालुक्यातील भेंडेवाडी येथील विनायक जायभाये हे आपल्या आखाड्यावर झोपण्यासाठी सोमवारी (ता. ३०) रात्री गेले होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या सुरक्षा भिंतीवरुन उडी घेतली. एवढेच नाही तर खिडकी तोडून त्यांनी घरात प्रवेश मिळविला. त्यांचे कुटुंबीय समोरच्या बैठकीत झोपले होते. थंडी वाढल्याने ते गाठ झोपेत असल्याचा फायदा चोरट्यांना मिळाला. लोखंडी पेटीतील ६३ हजार ७०० रुपयाचे सोन्या- चांदीचे दागिणे व नगदी पाच हजार असा ७३ हजार ७०० रुपयाचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी आशु विनायक जायभाये यांच्या फिर्यादीवरुन कंधार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री. गोन्टे करीत आहेत.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT