संग्रहित छायाचित्र 
मराठवाडा

लातूर : जन्माच्या तीन तासांतच आईने फेकले, कुत्र्यांमुळे वाचला प्राण

विवेक जाधव

उजेड (जि. लातूर) - जन्मानंतर अवघ्या तीन तासांत जन्मीदात्रीने त्याला एका शेतात फेकले. नाका-तोंडात माती गेली. अंगही मातीने माखले. हे जग काय आहे हे करण्यापूर्वीच त्या चिमुकल्या जिवाची ही अवस्था झाली. पण, परिसरात असलेल्या कुत्र्यांनी त्याला पाहिले आणि मोठ-मोठ्याने भुंकने सुरू केले. कुत्र्यांचे भुंकने एेकून काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या कोवळ्या बाळाचा जीव वाचला. ही घटना अंकुलगा सय्यद (ता. शिरूर अनंतपाळ) येथे आज घडली. त्या बाळावर लातूर येथील शासकीय आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. 

गुरुवारी सकाळी अंकुलगा सय्यद येथील एका शेतात सकाळी आठ वाजता कुत्र्यांच्या भुंकण्याने गावातील सचिन सूर्यवंशी व त्यांच्यासोबतच्या युवकांनी संशय घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांना त्या ठिकाणी एक नवजात मुलगा आढळला. त्यांनी तत्काळ पोलिस पाटील फारुख पटेल व तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष अख्तर सय्यद यांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळावरील स्थितीची पाहणी करून शिरूर अनंतपाळ पोलिस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरूर अनंतपाळ येथे संपर्क केला. रुग्णवाहिकेची वाट न पाहता पोलिस जमादार मोरे यांनी अंगणवाडी सेविका शहजादी पाशामियॉं शेख, आशा कार्यकर्ती अंजना चात्रे व सुरेखा गोणे यांना सोबत घेऊन पोलिसांच्या वाहनातूनच प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळाला दाखल केले होते. प्राथमिक तपासणी व उपचार केल्यानंतर बाळाला लातूर येथील शासकीय रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. बाळाची प्रकृती उत्तम आहे. 
 
प्रकृती चांगली, पण वजन कमी
बाळाच्या प्रकृती विषयी वैधकीय आधिकारी डॉ. बालाजी देवंग्रे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बाळ सापडण्याच्या तीन ते चार तासांपूर्वी त्याचा जन्म झालेला असवा. मातेची
अकाली प्रसूती झाल्याने त्याचे वजन केवळ दीड किलो आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident Highway : पुणे–कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडीत एसटी बसचा अपघात, २१ प्रवासी असल्याची माहिती

Dhurandhar 2 Trailer: रहमान डकैत मेला… आता लियारीचा नवा बादशाह कोण? ‘धुरंधर २’ ट्रेलरमध्ये रणवीर सिंगचा धडाकेबाज इशारा!

Latest Marathi News Live Update : कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलला पुरवल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचं काय करायचं? वितरकांचा सवाल

T20 World Cup: भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली, पण का? बॅड लक की आणखी काही?

Sairaj Patil UPSC Success : इंग्रजीचं टेन्शन विसरा! कराडच्या पठ्ठ्यानं मराठीतून शिकून यूपीएससीत मारली बाजी; 545 वी रँक मिळवत झाला IPS

SCROLL FOR NEXT