file photo
file photo 
मराठवाडा

अंध, अपंगांना मतदानासाठी मोफत रिक्षा

अनिल जमधडे

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी अंध, अपंग, वृद्ध, गरोदर महिला आदी गरजूंना मतदान केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार आरटीओ कार्यालयाने मोफत रिक्षांची सोय केली आहे. 


शहरातील प्रत्येक केंद्रावर गरजू मतदारांसाठी रिक्षांची सोय करून देण्यात आली आहे. शहरातील मतदान केंद्रांवर अंध, अपंग, वृद्ध, गरोदर महिलांसाठी तसेच इतर गरजू मतदारांसाठी जिल्हा निवडणूक विभागाने 330 मोफत रिक्षांची व्यवस्था केली आहे.

प्रत्येक केंद्रावर या मोफत सेवा देणाऱ्या रिक्षा उभ्या राहणार आहेत. निवडणूक विभागाने दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच संबंधित मतदान केंद्रांवर माहिती दिल्यानंतरही रिक्षाची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी निवडणूक विभागाने (क्र. 1950) हा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. अशी माहिती अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT