File photo
File photo 
मराठवाडा

गळके मतदान केंद्र, वीज गुल

सयाजी शेळके

उस्मानाबाद : शहरातील अनेक केंद्रांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दुपारी तीन ते चारपर्यंत उपाशीपोटीच मतदानाची प्रक्रिया पार पाडल्याचे वृत्त आहे. गळके मतदान केंद्र, विजेचा अभाव अन्‌ उंदरांचा सुळसुळाट यामुळे अनेक मतदान केंद्रांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त केली. 


मतदान केंद्रावरील अपुऱ्या सुविधांचा त्रास होत असल्याचे कर्मचारी सांगतात. सोमवारी (ता.21) शहरातील अनेक केंद्रांवर याचा प्रत्यय आला. नगरपालिकेच्या शाळा क्रमांक चारवर तीन मतदान केंद्र होते. या केंद्रांवर निंबाळकर गल्ली, काळा मारुती चौक या भागातील मतदार मतदान करतात. या केंद्रावर अपुऱ्या जागेमुळे मोठी गैरसोय झाली; तसेच तिन्ही केंद्राला गळती लागली होती. पावसामुळे रविवारी रात्री खंडित झालेला वीजपुरवठा सकाळपर्यंत सुरळीत न झाल्याने गैरसोय झाली.

जोरदार पावसामुळे केंद्र गळू लागल्याने मतदान यंत्र भिजते की काय, अशी भीती वाटत होती. त्यामुळे संपूर्ण रात्र जागून काढावी लागली. शिवाय रात्री जेवण, तर सकाळी नाश्‍ताही पोचला नाही. अखेर काही नागरिकांनी नाश्‍ता दिला. मतदानाच्या दिवशीही दुपारी चारपर्यंत अनेकांना जेवण मिळाले नाही. अखेर काहींनी शिपायांना पैसे देऊन जेवण मागवून घेतल्याचे अधिकारी सांगत होते. शहरातील भारत विद्यालयातील चार मतदान केंद्र, जुनी जिल्हा परिषदेतील तीन मतदान केंद्र, ख्वाजानगरमधील काही मतदान केंद्रांवर एकाही कर्मचारी, अधिकाऱ्यांना जेवणाची व्यवस्था नसल्याने नाराजी व्यक्त करीत होते. आम्ही रेशन दुकानदारांना जेवण पुरविण्याचे सांगितले असल्याचे म्हणत निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले. 


आम्ही लोकसभा निवडणुकीत जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी पूर्वसूचना मिळाल्याने बैठक घेऊन सर्वांना निरोप दिले होते. त्यामुळे कुठेच दिरंगाई झाली नाही; परंतु विधानसभा निवडणुकीत दोन दिवसांपूर्वी आम्हाला जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना मोबाईलवरुन मिळाल्या. सर्वांकडे अँड्रॉईड मोबाईल नसल्याने आम्हाला निरोपच मिळाला नाही. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे असा प्रकार घडला. 
- काकासाहेब कासार, जिल्हाध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT