File photo
File photo 
मराठवाडा

ट्रान्स्फॉर्मरच्या शांतीसाठी दिले गोड जेवण

सकाळ वृत्तसेवा

वाशी (जि. उस्मानाबाद) : लाखभर रुपये खर्च करूनही ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. दुरुस्तीसाठी अनेकवेळा मागणी करूनही वीज वितरण विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्‍त होत आहे.

दरम्यान, वैतागलेल्या शेतकऱ्यांनी ट्रान्स्फॉर्मरची विधिवत पूजा करून गोड जेवणाचे निमंत्रण देत सुमारे शंभर शेतकऱ्यांची पंगत घालून ट्रान्स्फॉर्मरची शांती केल्याची घटना शहरातील भांडवले वस्ती येथे तीन दिवसांपूर्वी घडली आहे. या घटनेची सर्वत्र जोरात चर्चा सुरू आहे. 


घराची शांती, लहान मुलांची शांती अशा विविध कारणांनी गोड जेवणाच्या पंगती उठविल्याचे आपण पाहिले आहे; मात्र शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी असलेल्या ट्रान्स्फॉर्मरची शांती करण्याचा प्रकार प्रथमच पाहायला मिळाल्याने या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी, की ट्रान्स्फॉर्मर जळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

शेतातील पिकांना पाणी देता येत नसल्याने पाणी उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. ट्रान्स्फॉर्मर जळण्याच्या प्रकाराने कंटाळून शहरातील भांडवले वस्तीवरील काही शेतकरी चक्क ब्राह्मणांकडे गेल्याचे वृत्त आहे. त्यावेळी संबंधित ब्राह्मणाने शेतकऱ्यांना ट्रान्स्फॉर्मरची पूजा करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना गोड जेवण देत ट्रान्स्फॉर्मरची शांती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वस्तीवरील काही शेतकऱ्यांनी गोड जेवणाचा कार्यक्रम उरकला. 

पुष्पा शर्माचे खुनी निघाले बांधकाम मजूर 

तब्बल सहा वेळा जळाले ट्रान्स्फॉर्मर 
शहरापासून अवघ्या काही अंतरावर भांडवले वस्ती असून, या ठिकाणी शंभर एचपीचा ट्रान्स्फॉर्मर आहे; मात्र रब्बी हंगाम सुरू झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत तब्बल सहा वेळा हा ट्रान्स्फॉर्मर जळाला. ट्रान्स्फॉर्मर जळाल्यानंतर वीज वितरण कंपनीकडून तत्काळ ट्रान्स्फॉर्मर मिळत नसल्याचा अनुभव असलेल्या शेतकऱ्यांनी तब्बल पाच वेळा स्वत: सुमारे एक लाख रुपयांचा खर्च केला; मात्र त्यानंतरही ट्रान्स्फॉर्मर जळाल्याने वैतागलेल्या काही शेतकऱ्यांनी थेट ब्राह्मणाचाच सल्ला घेण्याचा निर्णय घेतल्याचे काहींनी सांगितले. 

संबंधित विभागाकडून होते दुर्लक्ष 
नियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. मागील खरीप हंगामातून शेतकऱ्यांना कुठलेही उत्पन्न मिळाले नाही. परतीचा पाऊस चांगला झाल्याने रब्बी हंगामात चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत; मात्र रोहित्र जळण्याच्या प्रकाराने पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. परिणामी पिके सुकू लागल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. दुरुस्तीकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांनी अखेर गोड जेवणाच्या पंगती उठविल्याचे निदर्शनास येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT