भिकार सारोळा (ता. उस्मानाबाद) ः मोहरमनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत बापू जगदे, अण्णा जगदे, भैरू जगदे, जनक जगदे, गणेश जगदे आदी.
भिकार सारोळा (ता. उस्मानाबाद) ः मोहरमनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत बापू जगदे, अण्णा जगदे, भैरू जगदे, जनक जगदे, गणेश जगदे आदी.  
मराठवाडा

हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणारा मोहरम

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः तालुक्‍यातील भिकार सारोळा गावामध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन देणारा मोहरम सण जगदे कुटुंबीयांकडून साजरा करण्यात आला. जगदे यांच्या कुटुंबातील चौथी पिढी ही परंपरा चालवत आहे.


भिकार सारोळा गावामध्ये कोणीही मोहरम सण साजरा करीत नसल्याने गावातील माधव जगदे मोहरमच्या दिवशी आवर्जून बाहेरगावी जायचे. मात्र त्यांना पूर्वीपासूनच मोहरम सणावर श्रद्धा होती. एके दिवशी माधव जगदे यांना मोहरमला मान असलेली चंद्रकोर गावाच्या शिवारात आढळून आली. तेव्हापासून त्यांनी मोहरम साजरा करण्याची परंपरा सुरू केली. आता माधव जगदे यांची चौथी पिढी हा सण साजरा करीत आहे. दोन दिवस हा सण साजरा करण्यात येतो. सोमवारी (ता. नऊ) रात्री सवारी मिरवणूक काढण्यात आली. मंगळवारी (ता.दहा) दिवसभर धार्मिक कार्यक्रम करून सायंकाळी सहा ते दहापर्यंत गावातून हलगीचा कडकडाट अन्‌ फटाक्‍यांची आतिषबाजी करण्यात आली.

मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. संपूर्ण उत्सवाच्या कालावधीत हिंदू-मुस्लिम ऐक्‍याचे दर्शन घडते. हा उत्सव पार पाडण्यासाठी बापू जगदे, अण्णा जगदे, भैरू जगदे, जनक जगदे, गणेश जगदे, सचिन जगदे, प्रभू जगदे, भास्कर जगदे, तानाजी जगदे, बालाजी मेदने, बंडू माने, विजय मेदने, अण्णा माने, शामीर शेख, मैनुद्दीन शेख यांच्यासह गावातील हिंदू-मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्कचा पहिल्याच षटकात दणका; हैदराबादला दिला धक्का

वडगाव, धायरी परिसरात रात्री उशिरापर्यंत बार, हाॅटेल्समुळे उपद्रव; हल्ले, गुन्हेगारी अन् अपघातांमुळे नागरिक भयभीत...

Latest Marathi News Live Update: 'हिट अँड रन' प्रकरणाबाबत पुणे पोलीस आयुक्तालयात चर्चा सुरू

Swati Maliwal Assault Case : मालीवाल मारहाण झाली 'त्या' दिवशी तक्रार न देता पोलिस स्टेशनमधून का परतल्या? स्वतःच सांगितलं कारण

Shaheen Afridi : टी20 वर्ल्डकपच्या तोंडावर शाहीननं 'उप'कर्णधारपद नाकरलं? पीसीबीची सारवासारव करताना पळता भुई थोडी

SCROLL FOR NEXT