अणदूर (ता. तुळजापूर) : व्हाटस्अॅप ग्रुपवर धार्मिक भावना भडकावणारी पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या निषेध फेरीत सहभागी ग्रामस्थ.
अणदूर (ता. तुळजापूर) : व्हाटस्अॅप ग्रुपवर धार्मिक भावना भडकावणारी पोस्ट टाकणाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या निषेध फेरीत सहभागी ग्रामस्थ.  
मराठवाडा

अणदूर येथे कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा

अणदूर (जि. उस्मानाबाद) : व्हाटस्अॅप ग्रुपवर धार्मिक भावना भडकाविणारी, तसेच दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निषेधफेरी काढून शनिवारी (ता. सात) अणदूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

येथील वत्सलानगरातील युवकांचा महात्मा बसवेश्वर चौक नावाचा व्हाटस्अॅपवर ग्रुप आहे. या ग्रुपमध्ये सर्व जातीधर्माचे ११० सदस्य आहेत. त्यातील एकाने गुरुवारी (ता. पाच) धार्मिक भावना भडकावणारी व दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोख्यास बाधा होईल, अशी पोस्ट टाकली होती. त्या निषेधार्थ शनिवारी अणदूरमध्ये निषेध फेरी काढून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

निषेधसभा घेऊन तीव्र निषेध करीत समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ग्रुप ॲडमिन नितीन लक्ष्मण हागलगुंडे यांनी वादग्रस्त पोस्ट टाकणारा हाजी मलंग घुडूलाल शेख या सदस्याविरोधात नळदुर्ग पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून, त्यावरुन गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, सोशलसाइटवर जातीवाचक मेसेज टाकून धार्मिक भावना दुखावल्याने अणदूर व्यापारी संघटनेच्या वतीने दुपारपर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तसेच अणदूर ग्रामस्थांच्या वतीने निषेध फेरी काढून सभा घेऊन आपला निषेध व्यक्त केला. या वेळी ॲड. दीपक आलुरे, साहेबराव घुगे, राजकुमार स्वामी, दयानंद मुडके, साहेबलाल शेख, देवेंद्र घुगे, बाशा शेख, राजेश देवसिंगकर, अंकुश चिनकारे यांचे भाषण झाले. फेरीमध्ये व्यापारी संघटना, मुस्लिम बांधव, विविध संस्था संघटना, पक्ष, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT