File photo
File photo 
मराठवाडा

अंतिम टप्प्यात सर्वदूर दमदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात पावसाने बुधवारी (ता. 18) जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावली. परतीचा पाऊस सुरू झाल्याने शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 


जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात मोठा पाऊस झालेला नाही. आता पावसाळा संपण्यासाठी जेमतेम 15 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. तरीही परतीचा पाऊस जिल्ह्यात झालेला नव्हता. त्यामुळे शेतकरीवर्गात दुष्काळाचे ढग अधिकच गडद दिसत होते. दरम्यान, मंगळवारी जिल्ह्याच्या इटकळ (ता. तुळजापूर), येडशी, ढोकी, आळणी, कसबे तडवळे (ता. उस्मानाबद), मंगरूळ, हासेगाव (ता. कळंब), बलसूर भागात पावसाने दमदार हजेरी लावली. तर परंडा, अनाळा (ता. परंडा), देवधानोरा (ता. कळंब) परिसरात हलका पाऊस झाला. काही भागात यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पाऊस होता. त्यामुळे शेतकरीवर्गाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

परतीच्या पावसाची आशा 
जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वत्र जेमतेम पाऊस झाला. त्यामुळे काही भागात खरिपाची पेरणीच झाली नाही. शिवाय अनेक भागांत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न पावसाळ्यातही भेडसावत होता. आता परतीचा पाऊस जिल्ह्यात झाल्याने रब्बी पेरणीला वेग येणार आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात भूगर्भातील पाणीपातळी वाढण्याइतपत पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. बुधवारी जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप नाही तर किमान रब्बी हंगाम पदरात पडेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

पाणीटंचाईचे चटके 
गेल्या वर्षी जिल्ह्याच्या अनेक भागांत दुष्काळाचे चटके बसले आहेत. विशेष म्हणजे अजूनही अनेक गावांत टॅंकरने पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पावसाळा संपला तरीही विहिरी, कूपनलिकांना पाणी वाढलेले नसल्याने शेतकऱ्यांना चिंता सतावत होती. आता परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पाणीटंचाईचा प्रश्‍न मार्गी लागणार का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

शहरातही मध्यम पाऊस 
शहरात सुमारे 30 मिनिटे पावसाने चांगली हजेरी लावली. दुपारी तीन वाजून 35 मिनिटांनी पाऊस सुरू झाला. सुमारे अर्ध्या तासाच्या पावसाने अनेक भागांत पाणी साचले. शहरातील नालेही ओसंडून वाहत होते. शाळा सुटल्यानंतर घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT