शेतात पावसाचे पाणी शिरल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले.
शेतात पावसाचे पाणी शिरल्याने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. 
मराठवाडा

रब्बीसाठी दिलासा; मात्र सोयाबीन गेले

राजेंद्रकुमार जाधव

उस्मानाबाद : यंदा पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी, नाल्यांतून पाणी वाहिले, तर काही प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली. रब्बीच्या पेरणीसाठी हा पाऊस पोषक ठरणारा असला तरी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक 1074 मिलिमीटर पाऊस तुळजापूर तालुक्‍यातील सलगरा (दिवटी) मंडळात, तर सर्वांत कमी 329 मिलिमीटर पाऊस परंडा तालुक्‍यातील सोनारी महसूल मंडळात नोंदला गेला आहे.


जिल्ह्यात यंदा सुरवातीला अपेक्षित असा पाऊस झाला नाही. मोठे पाऊस झाले नसल्यामुळे नदी, नाले, ओढे कोरडे होते. तर बहुतांश प्रकल्प कोरडे पडले होते. केवळ रिमझिम पावसामुळे पेरणी झाली आणि पिकांची जोपासना झाली; मात्र अनेक दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पन्नही घटले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जिल्ह्यात भरपावसाळ्यातही दीडशेपेक्षा अधिक टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 


दरम्यान, रविवारी (ता. 20) रात्रीपासून सोमवारच्या (ता. 21) सकाळी दहापर्यंत जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. एकूण 12 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली. या जोरदार पावसामुळे हाताशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी करून त्याच्या गंजी रचल्या होत्या. अशा गंजी या पावसात भिजून नुकसान झाले. जेवळी (ता. लोहारा) भागात नदीला पूर आला. नदीपात्रातील अतिरिक्त पाणी नदीच्या दोन्ही बाजूंच्या शेतांत शिरल्याने पिकांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 


सर्वदूर पाऊस झाला तरी जिल्ह्यातील ठराविक महसूल मंडळांतच समाधानकारक आहे. उर्वरित मंडळांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वाधिक 1024 मिलिमीटर पाऊस सलगरा (दिवटी) महसूल मंडळात नोंदला गेला. सर्वांत कमी 329 मिलिमीटर पाऊस सोनारी मंडळात नोंदला गेला आहे. जिल्ह्यात एकूण 42 महसूल मंडळे आहेत. त्यापैकी 36 महसूल मंडळांत 500 पेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे, तर उस्मानाबाद तालुक्‍यातील पाडोळी (आ.), भूम तालुक्‍यातील वालवड, परंडा तालुक्‍यातील जवळा, अनाळा, सोनारी, आसू या सहा महसूल मंडळांत 500 मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस नोंदला गेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT