भोसले वस्ती (शेळगाव, ता. परंडा) ः रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातूनच शाळेकडे निघालेले विद्यार्थी. 
मराठवाडा

पाण्यातून वाट काढतच गाठावी लागते शाळा

अलीम शेख

अनाळा (जि.उस्मानाबाद) : शेळगाव (ता. परंडा) येथील भोसले वस्तीतील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना पावसाळ्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्त्यावर वाहणारे पाणी, चिखलातून वाट काढतच शाळा गाठावी लागत असल्याने मोठे हाल होत आहेत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी पालकांतून केली जात आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावर येत असल्याने पाण्यातून, चिखलातून मार्ग काढत दैनंदिन शाळेला हजेरी लावावी लागते. 
वस्तीपासून शाळा दोन किलोमीटर आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर पायपीट करीतच शाळेला ये-जा करावी लागते. पावसाळ्यात शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून पाणी वाहते. काही ठिकाणी रस्त्यावरच पाण्याचे डबके साचते. त्यातूनच विद्यार्थी, शिक्षकांना जावे लागते. ही शाळा दुर्गम भागात मोडते. दुर्गम, डोंगराळ, प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या शाळा, दळणवळणाच्या सुविधेचा अभाव गृहीत धरून दुर्गम क्षेत्र निश्‍चित करावयाचे होते. त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने परंडा तालुक्‍यातील कोकरवाडी, काठेवाडी, धोत्री, जगदाळवाडी, लोणारवाडी, काळेवाडी, पंचवाडा, भोसले वस्ती, शिंदेवस्ती, सक्करवाडी, लोखंडेवाडी, नरकेवस्ती, भिलारेनगर, लंगोटवाडी या 14 शाळा अंतिम दुर्गम म्हणून निवडल्या. परंतु जिल्हा प्रशासनाने सदरील गावे दुर्गम म्हणून घोषित न करता सर्व जिल्हा सुगम केला असल्याची तक्रार जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेने विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भोसले वस्ती शाळा ही अवघड क्षेत्रात असल्याचे घोषित करावे, अशी मागणीही संघटनेने केली असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये भोसले वस्तीतील विद्यार्थ्यांना रस्त्यावरील पाण्यातूनच वाट काढत शाळेकडे जावे लागते. 


पावसाळ्यात मुलांना रस्त्यावरील पाणी, चिखलातून वाट काढत शाळा गाठावी लागते. मुलांचे होणारे हाल लक्षात घेत प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी. 
- बाळासाहेब जामदारे, पालक, लोणारवाडी. 


परंडा तालुक्‍यातील 14 शाळा दुर्गम भागातील असतानाही त्या सुगम कशा झाल्या, असा प्रश्‍न आहे. त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. 
- वैजिनाथ सावंत, जिल्हाध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Daughters Property Rights India : …तर मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळणार नाही, नवीन कायदा काय सांगतो?

जुन्या ५०० अन् १००० च्या नोटा पुन्हा बदलून मिळणार? व्हायरल पोस्टमागचं सत्य काय?

"मी खूप दारू पिऊ लागले" धुरंधर फेम गायिकेने केला व्यसनाधीनतेबद्दल खुलासा "माझ्या पालकांनी माझं मन मोडलं"

Punjab Kings: पंजाब किंग्सचा दबदबा! IPL 2026 मध्ये कोणालच न जमलेला कारनामा श्रेयस अय्यरच्या शिलेदारांनी करून दाखवला

PM Kisan: 23वा हप्ता लवकरच! मात्र या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपये; कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT