national higway national higway
मराठवाडा

पुणे-मछलीपट्टनम महामार्ग गेला खड्ड्यात! चौपदरीकरणाचे काम अपूर्ण

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे काम अर्धवट स्थितीत असून, विविध कामे खोळंबली आहेत

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे काम अर्धवट स्थितीत असून, विविध कामे खोळंबली आहेत

जळकोट (ता. तुळजापूर): येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संथपणे सुरू आहे. परिसरातील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डेही पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसून मोठा अपघात होण्याची भीती बळावली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ चे काम अर्धवट स्थितीत असून, विविध कामे खोळंबली आहेत. प्रवासी, मालवाहतूक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यांची फरफट होत असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

जळकोट येथील हंगरगा फाटा ते बोरमन तांडा फाट्यापर्यंत वस्ती वाढली असून, सर्व्हिस रोडचीही गरज आहे. चार वर्षांपासून पुलाचे काम रखडल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन महामार्गावरून ये-जा करावी लागत आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना धोक्याची ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत नसून फार जवळ असलेली गावातील गटारी, साइड रस्ते, संरक्षक कठडे आदी विविध कामे खोळंबली आहेत.

नळदुर्ग बायपास अर्धवट
नळदुर्ग बायपासच्या सहा किलोमीटर अंतराचे कामही अर्धवटच आहे. गावातील रस्त्याने जाताना अनेक वाहनांचे टायर फुटण्याचे प्रकार वाढले आहे. शिवाय एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेमके कुठे थांबायचे असा संभ्रम कायम असून, प्रवास करण्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागते. चौपदरीकरणाचे काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने लवकर काम पूर्ण करावे, शिवाय याकडे लोकप्रतिनिधींनीही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

SCROLL FOR NEXT