Nilanga Rain Update  sakal
मराठवाडा

Nilanga Rain Update: निलंगा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीठ, फळपीकांचे मोठं नुकसान; 5 जनावरे दगावली

निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या हासोरी, उस्तूरी यासह कासार बालकुंदा परिसरातील गावांमध्ये शनिवारी ता. २० रोजी दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे.

राम काळगे

निलंगा :निलंगा तालुक्यातील महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या हासोरी, उस्तूरी यासह कासार बालकुंदा परिसरातील गावांमध्ये शनिवारी ता. २० रोजी दुपारी तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला आहे. या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेती व फळपीकाचे नुकसान झाले आहे.

हा पाऊस नेलवाड मिरगळी, हल्लाळी, ममदापूर, तांबाळा, तांबाळवाडी, उस्तूरी बडुर यासह परिसरामध्ये झाला. या पावसात विज पडून चार जनावरे दगावली आहेत. गेल्या कांही दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. हा पाऊस शेतातील काम करू देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

वादळी वाऱ्यासह मोठ्या पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आंब्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उस्तुरी व कासारसिरसी या गावांमध्ये तर गारांचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मौजे कलमुगली येथे वीज पडून ज्ञानेश्वर शिवाजी वाघमारे यांची म्हैस व गहीनिनाथ व्यंकट गोबडे यांच्या म्हशीचे लहान वासरू विज पडून मयत झाले आहे. मोजे टाकळी येथील श्रीरंग गोविंद नरहारे यांच्या दोन म्हैस व गणपती काशिनाथ बिरादार यांची एक म्हैस वीज पडून दगावली आहे.

या पावसामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कलमुगळी येथील अभय तांभाळे यांच्या शेतातील वांग्याच्या झाडाचे पूर्णतः नुकसान झाले आहे, झाडे आडवी पडले आहेत. उस्तुरी येथील भीमाशंकर मुळे व अनिल मुळे यांच्या शेतातील जमिनीमध्ये असलेले केशर आंब्याचे या पावसामुळे सडा पडला आहे.

झाडाला उर्वरित काही आंबे शिल्लक आहेत. मात्र त्या फळांना आंब्यांना गारांचा मार बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे कांही गावातील घरावरील पत्रे उडून गेले आहेत.

शिवाय दुपारनंतर निलंगा शहरासह तालुक्यातील लाइनचा पुरवठा विस्कळीत झाला असून नुकसान झालेल्या शेतीपीकाचे पंचनामे करून शेतातील गहू, कांदा, ज्वारीच्या पिकाचे नुकसान शासनाकडून पंचनामा करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

हवामान विभागाने दोन दिवस पावासाचा अलर्ट जाही केला असून वादळी वारे व विजेच्या कडकडाटामुळे जनावरे मृत्यू मुखी पडले आहेत. पूर्वी उष्णतेची लाट आता अवकाळी पाऊस यामुळे पावसाचा व वादळी वार्याचा अंदाज पाहून शेतकऱ्यांनी घराकडे वेळेत सुरक्षित यावे असे अवाहन तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

- तहसिलदार, प्रसाद कुलकर्णी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयोमर्यादा वाढवली, गांजा प्रकरणात दोषी असलेल्यांनाही प्रवेश मिळणार अन्...; सैन्यात भरतीचे नियम बदलले, कुणी घेतला निर्णय?

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

SCROLL FOR NEXT