माजलगाव धरण sakal
मराठवाडा

माजलगाव धरणाचे नऊ दरवाजे अर्धा मिटरने उघडले

सतरा हजार क्युसेकने सिंदफणेत सोडले पाणी

कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : गुरूवारच्या मध्यरात्री धरण कार्यक्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची मोठी आवक धरणात येत होती. त्यामुळे शुक्रवारी ता. 24 धरणाचे अर्धा मिटरने नउ दरवाजे उघडले असुन सतरा हजार 977 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

माजलगाव धरण हे परतीच्या पावसावर भरते परंतु यावर्षी ऑगस्ट महिण्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरण पुर्णक्षमतेने भरले. त्यामुळे 5 सप्टेंबर पासुन धरणात येणारे पाणी सिंदफणेत सोडणे सुरूच आहे. धरणात 431.74 मिटर एवढी पाणीपातळी असुन 449.20 दलघमी एवढा पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा 307.20 दलघमी झाला होता. धरणात येणा-या पाण्याची आवक जेवढी आहे तेवढेच पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

गुरूवारी ता. 23 मध्यरात्री धरण कार्यक्षेत्रात बरसलेल्या दमदार पावसामुळे शुक्रवारी धरणाचे 9 दरवाजे अर्धा मिटरने उघडत 17 हजार 977 क्युसेक वेगाने पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान माजलगाव धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने बीड, माजलगाव शहरासह अकरा खेड्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे तर नांदेड, बीड, परभणी या तीन जिल्ह्यातील सिंचनाचा प्रश्न देखिल सुटला आहे.

"धरण शंभर टक्के भरलेले आहे. हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज सांगीतलेला आहे. त्यामुळे धरणात जास्तीची आवक वाढल्यास सिंदफणा नदीपात्रात कोणत्याही क्षणी हे पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आपले पशुधन नदीकाठी आणु नये. जेणेकरून जिवीतहानी होणार नाही. नदीकाठापासुन दुर रहावे."

- बी. आर. शेख, धरण अभियंता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Farmer Loan Waiver : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर; 10 कोटी 20 लाखांचा लाभ मंजूर

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Marathi News Live Updates : भंडारा येथे तीन वर्षीय बालिकेवर अत्याचार, आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

SCROLL FOR NEXT