file photo 
मराठवाडा

हिंगोलीत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना फौजदारपदी पदोन्नती 

राजेश दारव्हेकर

हिंगोली : राज्य शासनाने मंगळवारी राज्यातील १०६१ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली असल्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांनी काढले आहेत.

राज्य शासनाने मंगळवारी (ता. २१) पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठते नुसार पोलीस उपनिरीक्षक २५ टक्के  कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे पोलीस अंमलदार म्हणून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यात नऊ पोलीस अमलदारांना सेवा जेष्ठतेचा लाभ मिळाल्याने त्यांना पदोन्नती मिळाली आहे.

यांची झाली पदोन्नती 

यामध्ये मुंजाजी गणपतराव वाघमारे, अशोक नामदेवराव कांबळे, विठ्ठल लालू जाधव, प्रकाश गणपतराव आवडे, मोहमद अरिफोद्दीन मोहमद ताजोद्दीन काजी, गंगाराम कचरू बनसोडे, फाक्रोद्दीन सिद्दीकी, उमर शेख, सुभाष आढाव यांचा पदोन्नती मिळाल्यात समावेश आहे. पदोन्नती प्राप्त अधिकाऱ्याना १५ दिवसाचा इंडक्शन कोर्स महाराष्ट्र पोलिस अकॅडेमी नाशिक येथे आयोजित केला आहे. बासंबा पोलीस ठाण्यातील बनसोडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पोलिस निरीक्षक मलपिल्लू यांनी सत्कार केला.

नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा

दरम्यान राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार यांची पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाली आहे. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले

पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील १०६१ पोलीस अंमलदारांना पोलीस उप निरीक्षक या पदावर पदोन्नती देण्याचे आदेश जारी केले. प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने पदोन्नती देण्यात आली आहे. हे सर्व अधिकारी अधिक जबाबदारीने नागरिकांची सेवा करण्यास सज्ज झाले आहेत.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable T20I Squad for SL Series: संजू सॅमसन OUT, अभिषेक शर्मा- वैभव सूर्यवंशी नवीन ओपनिंग जोडी? श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारताच्या संघात उलथापालथ

साप्ताहिक राशिभविष्य : (२९ नोव्हेंबर २०२६ ते ५ डिसेंबर २०२६)

SMASHED MASALA PANEER ROTI TACOS RECIPE: बाजारातले टॅको विसरा! उरलेल्या पोळीपासून घरीच बनवा चमचमीत पनीर टॅको; रविवारचा ब्रंच होईल हटके!

IND vs NZ 2nd Test Live: ध्रुव जुरेल नडला, भारताने Follow-On टाळला! आकाश, गुरनूरला सोबत घेत न्यूझीलंडला रडवले; तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पलटवार

India Probable ODI Squad for Sri Lanka Series: मोहम्मद सिराज बाकावरच, जसप्रीत बुमराहला विश्रांती? श्रीलंकाविरुद्ध कशी असेल भारताची वन डे टीम? लवकरच घोषणा

SCROLL FOR NEXT