Nitin Gadkari esakal
मराठवाडा

Latur News : नेहरुंच्या `रशिया मॉडेल`मुळे गावे दुर्लक्षित; नितीन गडकरी यांची टीका

देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांच्या काळात उद्योग, रस्ते झाले. त्यांच्या डोळ्यासमोर रशिया मॉडेल होते.

हरी तुगावकर : सकाळ वृत्तसेवा

Latur News : देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरु यांच्या काळात उद्योग, रस्ते झाले. त्यांच्या डोळ्यासमोर रशिया मॉडेल होते. त्यावेळेस देखील महात्मा गांधी म्हणायचे भारत हा गावात राहतो. पण या रशिया मॉडेलमुळे गावे दूर्लक्षित राहिली, अशी टीका केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केली.

लोकसभेच्या लातूर मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता.३) निलंगा येथे आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, क्रीडामंत्री संजय बनसोडे, माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, खासदार शृंगारे आदी उपस्थित होते.

देश स्वातंत्र्या झाल्यानंतर देशातील ९० टक्के जनता ग्रामीण भागात राहते, असे महात्मा गांधी म्हणायचे. पण त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. पंडित नेहरु यांच्या काळात उद्योग, रस्ते झाले. त्यांच्या डोळ्यासमोर रशिया मॉडेल होते. त्यामुळे गावांचा विकास दूर्लक्षित राहिला. गावा गावात शुद्ध पाणी मिळू शकले नाही,

शाळा होवू शकल्या नाहीत, रस्तेही झाले नाहीत. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा गावाकडे पाहिले. साडे सहा लाख खेड्यात रस्ते नव्हते. या रस्त्याची योजना करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती. त्यातूनच पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरु झाली. साडे चार लाख गावात मजबूत रस्ते झाले, असे ते म्हणाले.

गावे समृद्ध झाली तर देश समृद्ध होणार आहे. हेच धोरण मोदी सरकारने अवलंबले आहे. आज शेतकरी इथेनॉल, डांबर, हवाई इंधन तयार करु लागला आहे. हे प्रमाण वाढण्याची गरज आहे. दुचाकी, तीन चाकी गाड्या इथेनॉलवर धावत आहेत.

भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी आहे. इंडियन ऑईल कंपनी देशात तीनशे इथेनॉलचे पंप सुरु करणार आहे. शेतकरी अन्नदात्यासोबतच तो ऊर्जादाता बनावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्मार्ट व्हिलेज करण्यावर आमचा भर आहे. असे व्हिजन असणाऱ्या सरकारच्या पाठीशी आपण उभे रहावे, असे आवाहन गडकरी यांनी मतदारांना यावेळी केले.

संविधान बदलले जाईल असे विरोधक खोटे सांगत आहेत. संविधानातील मुलभूत तत्वे बदलता येणार नाहीत, अशी तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करुन ठेवली आहे. संविधान ८० वेळा तोडायचे पाप काँग्रेसवाल्यांनी केले आहे. आणीबाणीच्या काळात तर काँग्रेसने संविधानाची ऐशी की तैशी करुन टाकल्याची टीकाही गडकरी यांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: जसप्रीत बुमराहला नडला, त्या सैम आयुबचा करेक्ट कार्यक्रम केला! पाकिस्तानने १२ चेंडूंत गमावले ३ फलंदाज

Nagpur Mumbai Duronto Express : नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल; काही गाड्यांचे स्थानकही बदलणार, कधीपासून लागू होणार वेळापत्रक?

IND vs PAK T20 WC: इशान किशनची फटकेबाजी, भारताने उभे केले सर्वात मोठे लक्ष्य; पाकड्यांनी ६ स्पिनर्स वापरले, तरीही...

Mulund: २ कोटींची भरपाई, सरकारी नोकरी अन्...; मुलुंड दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या रामधनींच्या कुटुंबियांच्या मागण्या काय?

Mumbai High Court : मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यास उच्च न्यायालयाचा नकार, मुलीच्या हिताला प्राधान्य; वडिलांची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT