Collector Dr.Vipin_.JPG 
मराठवाडा

मद्य शौकीनांना नाही दिलासा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने एकविस दिवसाचा लॉकडाऊन लागू केला. या काळात सर्व अस्थापनासोबतच देशी, विदेशी दारु तसेच बियरबार व परमिट रुम बंद केले आहेत. यामुळे मद्य शौकीन बैचेन झाले आहेत. अनेकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दारुविक्री सुरु करण्याची मागणी केली आहे. परंतु जिल्हा प्रशासनाने मात्र मद्य विक्री बंदी ता. १४ एप्रीलपर्यंत वाढविली आहे.   

संपूर्ण दिवस राहणार बंद
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम १४२ (१) अन्वये संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी मद्य विक्री अनुज्ञप्ती (सीएल-३), विदेशी मद्य व बिअरची किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-२, एफएल-३ व एफएल-४), बिअर विक्री किरकोळ विक्री अनुज्ञप्ती (एफएल-बीआर-२), पॉपी २ अनुज्ञप्त्या तसेच किरकोळ ताडी विक्री केंद्र (टिडी-१) अनुज्ञप्ती ता. ३१ मार्च  पर्यंत बंद ठेवण्याचा कालावधीत वाढवून मंगळवार ता. १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी निर्गमीत केले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारका विरुद्ध महाराष्ट्र मद्य निषेध कायदा १९४९ चे कलम ५४ व ५६ अन्वये कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

हेही वाचा....

कोरोना रोखण्यासाठी माध्यमांनी उपाययोजना कराव्यात 
जिल्ह्यात वृत्तपत्र छपाई, विक्री करणारे एजंट, विक्रेता, इलेक्ट्रॉनिक मिडिया या माध्यमांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध करावयाच्या आवश्यक उपाययोजना निर्देशाबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.

हेही वाचलेच पाहिजे....
कोव्हीड -१९ अंतर्गत उपाययोजना
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये निर्गमीत करण्यात आलेली अधिसुचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील वृत्तपत्रे व इलेक्ट्रॉनिक मिडीया व माध्यमांनी कोव्हीड -१९ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत.

सॅनिटायझर व मास्क द्यावेत
वृत्तपत्रांचे वितरण करणारे एजंट, छपाई, विक्रेते व वाटप करणारे लाईने बॉय यांना जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडून वितरीत करण्यात आलेले विहित नमूद ओळखपत्र बाळगावेत तसेच वृत्तपत्र वितरण सकाळी पाच ते सकाळी आठ या कालावधीत करावे. स्टॉल लाऊन वृत्तपत्र विक्रीस प्रतिबंध राहील. वृत्तपत्र छपाई व वितरणांच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याबाबत सर्वांना सुचना दयाव्यात. कार्यालयामध्ये स्वच्छता ठेवावी व निर्जतुकीकरणाची फवारणी करावी. दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवण्यात यावे. वृत्तपत्र वितरण कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करुन द्यावेत.

पुढील आदेशापर्यंत राहणार अंमल
हा आदेश पुढील आदेशापर्यंत अंमलात राहील तसेच यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश व परिपत्रके या आदेशासह अंमलात राहतील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Quota Conflict: सक्षम खातील, दुर्बल बघत राहतील... मूळ ओबीसींच काय होणार? नेपाळसारखी परिस्थिती अन्...; आरक्षण अभ्यासकांचा इशारा

Digital Minister: मंत्रिपदाची जबाबदारी 'एआय'वर; टेंडर्सवर ठेवणार नजर, भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले

Central Government Employees and Pensioners: दिवाळीआधी केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांना सरकारकडून मिळणार मोठा दिलासा!

Ashes 2025-26 : मॅथ्यू हेडन विवस्त्र होऊन MCG स्टेडियमला चक्कर मारणार? मुलगी ग्रेसची Joe Root ला एक विनंती, वाचा काय प्रकरण

Jan Aushadhi Kendra: आता घराजवळच स्वस्त औषधे मिळणार! हजारो जनऔषधी केंद्र उघडणार, नवा नियम कधीपासून लागू होणार?

SCROLL FOR NEXT